
Jalgaon : ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने 43 हजारात गंडवले
जळगाव : एसएमआयटी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाला लकी ड्रॉ (Lucky Draw) लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. (lure of Lucky Draw fraud of 43 thousand Jalgaon crime News)
शहरातील मुक्ताईनगरात हेमंत गुलाब चौधरी (वय ३४, रा. एसएमआयटी महाविद्यालयाजवळ) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. गुरुवारी (ता. २८) दुपारी हेमंत चौधरी घरी असताना त्याच्या मोबाईलवर ९ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाइन व्यवहार फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता समोरील अनोळखी व्यक्तीने तुम्ही लकी ड्रॉ म्हणून ९ लाख ५० हजार रुपये जिंकले आहे, असे सांगून जीएसटी म्हणून ९ हजार ५०० रुपये खात्यात जमा करावे लागेल असे सांगितले. हेमंतने गुगलपेवरून राहुल कुमार सॉ नामक व्यक्तीच्या खात्यान ९ हजार ५०० रुपये भरले. नंतर पुन्हा इनकम ट्रॅक्स म्हणून ३३ हजार ९५० रुपये भरायला सांगितले.
त्यानुसार हेमंत चौधरी याने पुन्हा पैसे पाठविले. परंतू लकी ड्रॉचे पैसे आले नाही. यावरून आपली ४३ हजार ४५० रूपयांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी १ जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नीलेश भावसार करीत आहेत
हेही वाचा: Jalgaon Crime : चोपड्यात घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास
Web Title: Lure Of Lucky Draw Fraud Of 43 Thousand Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..