Maha Vikas Aghadi : मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधिगिरी; महाविकास आघाडीचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha Vikas Aghadi protest in municipality to get permanent chief executive jalgaon news

Maha Vikas Aghadi : मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधिगिरी; महाविकास आघाडीचे आंदोलन

यावल (जि. जळगाव) : येथील नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा म्हणून महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) नगरपालिकेत आंदोलन करण्यात आले व मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत खुर्चीला हार टाकून गांधीगीरी करत तहसील कार्यालयात निवेदन देऊन

कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी केली आहे व ज्यांच्याकडे चार्ज आहे, त्यांनी किमान आठवड्यातून दोन दिवस यावलला द्यावे, अशी मागणी केली आहे. (Maha Vikas Aghadi protest in municipality to get permanent chief executive jalgaon news)

गेल्या सहा महिन्यांपासून येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद प्रभारी आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबून राहतात, मुख्याधिकारीपदी कायम नियुक्ती करावी, या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली.

मात्र शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मोहसिन खान अब्दुल वहाब खान यांच्या नेतृत्वात आंदोलन करत मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार टाकून गांधीगिरी करण्यात आली. कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, या आशयाचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यात त्यांनी म्हटले आहे, की यावल नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. मुख्याधिकारी पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात चोपडा मुख्याधिकारी यांच्याकडे आहे. ते पालिकेत अनियमित असतात. त्यामुळे शहरातील विकासकामांसह नागरिकांची अनेक कामे रेंगाळली आहेत. नागरिकांच्या मूलभूत अडचणी सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या पालिकेला लोकप्रतिनिधी नसल्याने व प्रशासक असल्याने प्रशासकाशिवाय कामे होत नाहीत, तेव्हा पालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावे, तोपर्यंत मुख्याधिकाऱ्यांनी किमान आठवड्यातून दोन दिवस तरी यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर मोहसीन खान, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी, आबिद कच्छी, संतोष खर्चे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, सय्यद सईद, गुणवंत निळ, प्रतिभा निळ, अरुण लोखंडे, कामराज घारू, फारुख हाजी, बापू जासूद, आरिफ खान, एजाज मणियार, अनिकेत तडवी, आसिफ शेख, इरफान खान, नीलिमा धांडे, ललित पाटील, शरीफ तडवी, प्रकाश पारधे, संतोष धोबीसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :JalgaonMaha Vikas Aghadi