
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत 10 हजार कामगार
जळगाव : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८३५ कामे सुरू असून ४४४ ग्रामपंचायतींमध्ये कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी दिली. या कामांवर तब्बल ९ हजार ९६८ मजुरांची उपस्थिती आहे. ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्रतेतही रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांमध्ये आशादायक वातावरण आहे.
हेही वाचा: केळीला सहा वर्षानंतर विक्रमी भाव
जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तीक स्वरूपाचे कामे केली जात आहेत. त्यात सिंचन विहीर, घरकुल, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड, रोपवाटीका, फळबाग, गोठा शेड, वैयक्तीक वृक्ष लागवडी यासारख्या कामांचा समावेश आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीला १ हजार ८३५ कामे सुरू आहेत.
तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती
अमळनेर--८२४
भडगाव--३०६
भुसावळ-- १४६
बोदवड--४७७
चाळीसगाव--६८९
चोपडा--७८६
धरणगाव--२०७
एरंडोल--३९९
जळगाव--१५०
जामनेर--१२७९
मुक्ताईनगर-- २१
पाचोरा--६०९
पारोळा-- २८०५
रावेर-- ५२२
यावल-- ७४८
एकूण-- ९ हजार ९६८
हेही वाचा: जळगाव : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती खात्यावर ‘डाका’
Web Title: Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme 1835 Works Are Underway In The District In Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..