पोलिसांची ड्यूटी आठ तासांची करा; पोलिस मित्र संघटनेतर्फे निवेदन

पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाचा विचार करण्याची गरज आहे.
Police
Policeesakal

शहापूर (ता. जामनेर) : जामनेर तालुका पोलिस मित्र संघटनेच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे व पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना पोलिस बांधवांची आठ तास ड्यूटी करावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाचा विचार करण्याची गरज आहे. चोविस तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे ड्यूटी आठ तासांची करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या वेळी जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष ईश्वर चोरडिया, जिल्हा संघटनप्रमुख किशोर खोडपे, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष दशरथ पाटील, जळगाव जिल्हा युवा सहसंघटक सुमित मुणोत, जिल्हा उपसचिव रितेश डांगी, जामनेर तालुका युवक अध्यक्ष भूषण कानडजे, जामनेर तालुका सह निरीक्षक अशरफ कंजर, जामनेर तालुका सह सचिव राहुलरॉय मुळे, जामनेर तालुका सदस्य प्रल्हाद पाटील, कल्पेश कोठारी, विकास इंगळे, विशाल सोनवणे, राहुल पाटील, विशाल पाटील, विवेक कुमावत, मनोज खोडपे हे उपस्थित होते.

Police
Video: 'बारीक व्हा...बारीक व्हा', स्टेजवरच अजित पवारांनी DCPना टोला लगावला
Police
ऑनलाइन व्यवसायाचे आमिष महागात; रक्कम बँकेत जमा होताच मारला डल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com