तू मेरी नहीं तो, किसी की नही... चाकू दाखवत मजनुने केले तरुणीचे अपहरण

एखाद्या सिनेमात शोभावा, अशा पद्धतीने २० वर्षीय विवाहित तरुणीला चाकूचा धाक दाखवत त्याने अपहरण केले.
kidnapping
kidnappingesakal
Updated on

जळगाव : एखाद्या सिनेमात शोभावा, अशा पद्धतीने ‘तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही’, असे म्हणत २० वर्षीय विवाहित तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. हातात काचेची बॉटल घेत तिच्या वडिलांना धमकावून ठार मारण्याची धमकी दिल्याची थरारक घटना घडली.

शहरातील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २० वर्षीय विवाहित तरुणी १२ मेस दुपारी तीनला गुजराल पेट्रोलपंपाकडून घराकडे जात होती. या वेळी निखिल वना सोनवणे (आहुजानगर, निमखेडी, जळगाव) याने दुचाकीने रस्ता अडवून तिला धमकावले. तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर बळजबरी दुचाकीवर बसवून शिवाजीनगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेऊन तरुणीला एका खोलीत डांबून ठेवले. पीडितेने प्रसंगावधान राखत गोड बोलून तेथून सुटका करून घेतली.

kidnapping
Youtube पाहून तो घरातच छापायचा बनावट नोटा; हिंगणेच्या तरुणाचा प्रताप

पहाटे शिरला घरात

निखिल सोनवणे याने दारुच्या नशेत गुरुवारी (ता. १९) पहाटे पीडितेच्या घरी धडक दिली. घराच्या संरक्षकभिंतीवरून उडी मारून तो हातात फोडलेली काचेची बाटली घेतच आत आला. पीडितेच्या वडिलांना जाग आली. त्याने पीडिता व तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. अखेर भेदरलेल्या अवस्थेत हे कुटुंबीय पोलिस ठाण्यात पोचले. पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात निखिल सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक नयन पाटील तपास करत आहेत.

kidnapping
तो वेडा आहे सांगणाऱ्या पोलिसांनाच बनवले ‘मामू’; कैद्याने काढला पळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com