Jalgaon Milk Union : चेअरमनपदासाठी भाजप शिंदे गटातर्फे मंगेश चव्हाणांचे नाव निश्‍चित?

mla mangesh chavan
mla mangesh chavanesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या चेअरमपदाची निवड रविवारी (ता. १८) होणार आहे. उमेदवारी अर्जही याच दिवशी सकाळी नऊला भरण्यात येणार आहे. बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांचे नाव निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत आहे. (Mangesh Chavan name confirmed by BJP Shinde group for post of chairman at Jalgaon district Milk Union)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात शिंदे- भाजप गटाने सर्वाधिक १५, तर महाविकास आघाडीने पाच जागा जिंकल्या आहेत. रविवारी चेअरमनपदाची निवड होणार आहे. बहुमत असलेल्या शिंदे -भाजप गटातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने प्रशासक मंडळ नेमल्यानंतर आमदार चव्हाण मुख्य प्रशासक होते.

यामुळे त्यांना दूध संघाची माहिती आहे. संचालक निवडणुकीतही त्यांनी मोठ्या प्रमाणावर जोर लावला होता. त्यांनी एकनाथ खडसे यांना थेट आव्हान देत मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळविला आहे. शिवाय पॅनलच्या विजयासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चेअरमनपदासाठी त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

mla mangesh chavan
Nashik Political News : नाशिकचा विकास नव्हे, वैयक्तिक विकासाचे मॉडेल!

आमदार म्हणून त्यांना आपल्या मतदारसंघासाठी वेळ द्यावयाचा असल्याने एक वर्षासाठी तरी चेअरमनपद त्यांच्याकडे असण्याची शक्यता असल्याचे सागंण्यात येत आहे. चेअरमनपदासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य राहील, असे आमदार चव्हाण यांनी अगोदरच जाहीर केले आहे.

रविवार सकाळपासून प्रक्रिया

चेअरमनपदाच्या निवडीची प्रक्रिया रविवार (ता. १८) सकाळी नऊपासून जिल्हा दूध संघाच्या सभागृहात होणार आहे. सकाळी नऊला चेअरमनपदासाठी अर्ज देण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना दहा मिनिटे माघार घेण्याची वेळ देण्यात येईल. एकच अर्ज आल्यास बिनविरोध निवड जाहीर करण्यात येईल. दोन किंवा अधिक अर्ज आल्यास निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

mla mangesh chavan
Ajay Boraste | सिल्वर ओकचे दलाल कोण आहे, हे सर्वांना माहीत : अजय बोरस्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com