Ajay Boraste | सिल्वर ओकचे दलाल कोण आहे, हे सर्वांना माहीत : अजय बोरस्ते

ajay boraste news
ajay boraste newsesakal

नाशिक : आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा शब्द दिल्याने आम्ही शिंदे गटात प्रवेश केला, असा दावा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. शिंदे गटात प्रवेशकर्त्या झालेल्या माजी नगरसेवकांना दलाल व गद्दार असा उल्लेख केल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता बोरस्ते यांनी त्यांच्यावर पलटवार केला. नाशिकमध्ये केवळ पर्यटनासाठी येणारे व सिल्वर ओकचे दलाल कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला. (shivsena Ajay Boraste statement on oppositions nashik news)

शिवसेनेच्या १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. दलाल व गद्दार असे शब्द प्रयोग केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ माजी नगरसेवकांचे नेतृत्व करणाऱ्या बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई, पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे शहर आहे. मात्र, अनेक वर्षांपासून त्रिकोणाची एक बाजू अर्थात नाशिकचा विकास ठप्प झाला आहे.

औरंगाबाद ठाणे व नागपूरच्या तुलनेत नाशिककडे दुय्यम अंगाने बघितले जाते. वास्तविक सर्व प्रकारच्या क्षमता असताना नाशिकचा हवा तसा विकास झालेला नाही. विकासासाठी राजकीय दूरदृष्टी व पाठबळ हवे असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नाशिकच्या विकासाची दृष्टी बदलली आहे. नाशिकच्या विकासाकडे बारकाईने पाहिले जाते. ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कामे बाजूला ठेवून नाशिकचा दौरा केला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

ajay boraste news
Nashik Political News : नाशिकचा विकास नव्हे, वैयक्तिक विकासाचे मॉडेल!

या वेळी अपघातग्रस्तांची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या, नाशिकबद्दल शिंदे यांच्या मनात आस्था आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नाशिकच्या विकास होऊ शकतो. नाशिकचा विकास रोखण्याचा कपाळकरंटेपणा आम्हाला मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला.

पक्षांर्तगत कुरबुरी

आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही, मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत कुरबुरी व टोमणेबाजी सुरू होती. यामुळे मानसिक त्रास झाला. पक्ष सोडून जावा असे काहींनी प्रयत्नदेखील केले, चुकीच्या अफवा पसरविल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण नाशिकच्या विकासासाठी प्रवेश करत असल्याचे बोरस्ते म्हणाले.

ajay boraste news
Dhule Accident News : एसटी कंटेनरवर आदळली; चालकासह 12 प्रवासी जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com