Jalgaon News : गजानना तूच माझा मुलगा, तूच सांभाळ! आंबे वडगावच्या ‘त्या’ आजीची ‘डिस्चार्ज’प्रसंगी आर्त हाक

Gajanan Kshirsagar and hospital staff taking an elderly woman home after successful treatment.
Gajanan Kshirsagar and hospital staff taking an elderly woman home after successful treatment.esakal

Jalgaon News : आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथील वृद्ध महिलेस 'नातलगांनी अव्हेरले पण माणुसकीने तारले' अशा मथळ्याचे वृत्त 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर समाजमनातून अत्यंत संवेदनशील व भावनिक भावना व्यक्त झाल्या. (Manusaki Group Chairman Gajanan Kshirsagar save old age women jalgaon news)

जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या आजीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला ‘डिस्चार्ज’ मिळाला असून, माणुसकी ग्रुपचे अध्यक्ष गजानन क्षीरसागर यांच्यामुळे वाचल्याची भावना व्यक्त करत 'गजानन तूच माझा मुलगा, तूच सांभाळ' अशी आर्त हाक या वृद्ध महिलेने रुग्णालयातून सुटी मिळाल्याप्रसंगी व्यक्त केली. या वेळी सारेच भावनिक झाले.

आंबे वडगाव येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेस नातलगांचा प्रचंड गोतावळा असला तरी रक्ताच्या नात्यातील मंडळींनी आहे ती मालमत्ता गोडी गुलाबीने घेऊन या वृद्धेस एकाकी ठेवले होते. बेवारस सदृश एकाकी पणाचा या वृद्धेच्या मनावर परिणाम झाल्याने ही वृद्धा शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमालीची खचली व घरातच बेशुद्ध अवस्थेत पडून असताना शेजारच्यांनी तिच्या नातवाशी संपर्क साधला.

परंतु त्यांची वृद्धेवर उपचार करण्याची व सांभाळण्याची मनोवृत्ती नसल्याचे पाहून जळगाव येथील माणुसकी ग्रुपचे गजानन क्षीरसागर यांना या वृद्धेसंदर्भात माहिती दिल्यानंतर क्षीरसागर यांनी तत्काळ आंबे वडगाव येथे येऊन नातलगांशी संपर्क केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना माहिती देऊन या वृद्धेस रुग्णवाहिकेने प्रथम पाचोरा ग्रामीण रुग्णालयात व नंतर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gajanan Kshirsagar and hospital staff taking an elderly woman home after successful treatment.
Jalgaon Railway News : आषाढीनिमित्त 76 विशेष रेल्वेगाड्या; मध्य रेल्वेची 23 जून ते 3 जुलैदरम्यान सेवा

आठवडाभराच्या यशस्वी उपचारानंतर या वृद्ध महिलेची प्रकृती सुधारली असून, तिला रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ मिळाला आहे. दरम्यान, या वृद्धेची रवंजा (ता. एरंडोल) येथे राहणाऱ्या मुलीस माहिती मिळाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. आईची अवस्था पाहून त्यांनी फोडलेला हंबरडा साऱ्यांनाच भावनिक करणारा होता.

शासकीय रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १३ मध्ये डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. गोविंद पाटील, परिचारिका प्रीती गणेश्वर, प्रेमराज पाटील, रेखा चांगरे, पंकज पाटील, नितीन पाटील यांनी या वृद्धेस योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा देऊन योग्य उपचार केल्याने सदर वृद्धेची प्रकृती सुधारली असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

रुग्णालयातून घरी परतताना या वृद्धेने माणुसकी ग्रुपचे गजानन क्षीरसागर यांना 'आता तूच माझा मुलगा, तूच सांभाळ' अशी आर्त हाक दिली.

Gajanan Kshirsagar and hospital staff taking an elderly woman home after successful treatment.
Jalgaon Water News : अहो..पाणी मिळेल का पाणी!; पालिकेवर धडक

त्यावेळी उपस्थित साऱ्यांच्याच पापण्या ओलावल्या. या वृद्धेच्या पुनर्वसनाची व सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या मुलीने घेतली असून, सध्या या मायलेकी आंबे वडगावला विश्रांती घेत आहेत. माणुसकी ग्रुपच्या मानवतावादी कार्यामुळेच या वृद्धेला जीवदान मिळाल्याने माणुसकी ग्रुपचे कौतुक होत आहे.

"आपल्याला मोठे करणाऱ्या आई-वडिलांकडे आपण मोठे झाल्यानंतर दुर्लक्ष करतो. त्यांना जेव्हा आपला आधार हवा असतो, तेव्हा तो त्यांना देणे आपले कर्तव्य असते. परंतु बरीचशी मुले वृद्ध आई, वडिलांकडे दुर्लक्ष करून त्यांना एकाकी टाकतात व पुन्हा त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवतात. हे योग्य नसून वृद्ध आई, वडिलांची जबाबदारी न घेणाऱ्या मुलांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे." - गजानन क्षीरसागर, अध्यक्ष, माणुसकी ग्रुप

Gajanan Kshirsagar and hospital staff taking an elderly woman home after successful treatment.
Jalgaon News : हिंदू-मुस्लिम बांधवांनी घेतली एकतेसाठी शपथ; शांतता समितीची बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com