Jalgaon News : मराठी, हिंदी, इंग्रजीचे व्याकरण एकाच पुस्तकात! लुंकड कन्या शाळेचा अनोखा उपक्रम

While releasing the combined grammar book of Marathi, Hindi, English prepared by Lunkad Kanya School, Adv. Sushil Atre and other teachers.
While releasing the combined grammar book of Marathi, Hindi, English prepared by Lunkad Kanya School, Adv. Sushil Atre and other teachers.esakal

Jalgaon News : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प.न.लुंकड कन्याशाळेतील उपशिक्षक प्रवीण धनगर यांच्या संकल्पनेतून मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचे व्याकरणाचे एकत्रित तुलनात्मक पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. (Marathi Hindi English grammar in one book jalgaon news)

व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे, व्याकरणाला भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हटले जात याच व्याकरणाचा अभ्यास सहज, सोपा व सुलभ व्हावा या उद्देशाने मराठी, हिंदी व इंग्रजी व्याकरणाचे एकत्रित पुस्तक शाळेतील व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी पडेल.

व्याकरण पुस्तक निर्मितीत शाळेतील इयत्ता ७वी व ८ वीच्या ११ विद्यार्थिनींचाही सहभाग घेतला आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनींना नवनिर्मितीची संधी शाळेने उपलब्ध करून दिली.

While releasing the combined grammar book of Marathi, Hindi, English prepared by Lunkad Kanya School, Adv. Sushil Atre and other teachers.
Jalgaon Sand News : बांभोरी पुलाखालचे तळ पोखरले... आता रेल्वे पुलालगत वाळू तस्करी

व्याकरण पुस्तिकेतील प्रस्ताविकेचे लेखन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे यांनी केले असून शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांनी भाषा व व्याकरणाचे महत्त्व आपल्या अभिप्रायातून व्यक्त केले आहे.

पुस्तकाचे प्रकाशन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या विश्वस्त पद्मजा अत्रे, मुख्याध्यापिका स्वाती नेवे, अ.वा.अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रीती झारे, अनिल सैंदाणे, वंदना तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सूत्रसंचालन वैभव देसाई यांनी कले. शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य, विश्वस्त व समन्वयक यांनी पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थिनींना याचा नक्की उपयोगी होईल अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

While releasing the combined grammar book of Marathi, Hindi, English prepared by Lunkad Kanya School, Adv. Sushil Atre and other teachers.
Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील 592 गावांना पाणीटंचाईची झळ; 10 कोटींचा आराखडा तयार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com