लुटेरी दुल्‍हन..विवाह करून पंधराच दिवस नांदायची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud marriage

लुटेरी दुल्‍हन..विवाह करून पंधराच दिवस नांदायची

कळमसरे (जळगाव) : विवाह इच्छूक (Fraud marriage) तरूणांडून लाखो रूपये घेवून एकाच तरुणीचे अनेकांशी विवाह करत नौ दो ग्यारह होत होती. तसेच १५ दिवसातच तरूणीचे दूसरे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला मारवड पोलिसांच्या (Police) सतर्कतेने पकडण्यात यश आले असून दोन महिलासह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर लग्नस्थळावरून इतर जण फरार झाले आहेत. (woman fraud marriage many in the name of earning money)

हेही वाचा: अनोखी शक्कल..कर भरणाऱ्यांना मिळणार सोन्याची नथ

शहादा तालूक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे याचे ६ मे रोजी हिंगोली येथील सोनू राजू शिंदे (रा. सिद्धार्थनगर) हिच्याशी विवाह झाला होता. आठ दिवस वधू मुलगी भूषण यांचेकडे राहिली. मात्र १५ मे रोजी ती घरातून कोणालाही न सांगता पळून गेली. दुसऱ्या दिवशी म्‍हणजे १६ मे रोजी भूषणने शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली. या घटनेचा तपास हवालदार दीपक परदेशी व विश्वास साळुंखे करीत होते.

आणखी एक लग्‍न लावण्याच्या तयारीत

दरम्यान ही मुलगी अमळनेर तालूक्यातील कपिलेश्वर या त्रिवेणी संगम असलेल्या मंदिरावर आज (ता. २१) पून्हा दुसरे लग्न करणार असल्याची खबर मारवड पोलिसांना मिळाली. यानुसार मारवड पोलिस स्टेशनचे पोलीस सहायक निरीक्षक राहुल फुला, हवालदार बबलू होळकर, अनिल राठोड, होमगार्ड चारुदत्त पाटील यांना सोबत घेत लागलीच कपिलेश्वर मंदिरावर पोहचले. मात्र सदर विवाह जूळवणारी टोळी धूळे जिल्ह्यातील मुडावद (ता. शिंदखेडा) येथे गेले असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा: जळगाव जिल्‍ह्यात सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

अखेर लागले पोलिसांच्या हाती

अखेर चकमा देणाऱ्या टोळीला पडावद येथे पकडले. या ठिकाणी सोनू ही प्रवीण शिवाजी पाटील यांच्याकडे लग्न सोहळा करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर कुटूंबाला विश्वासात घेत सोनूची बंटी बबली कथा सांगीतली व तातडीने सोनू व तिची मावशी पूजा प्रताप साळवे (रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) तसेच तिचा मामा योगेश संजय साठे (रा. शिवसेनानगर, अकोला) यांना अटक केली. मुलीची आई व भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन

आरोपीना नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नरडाणा पोलिसांकडून ते शहादा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या सतर्कतेने अनेक मूलांशी विवाह करणारी स्वतः वधूच सापडली असून पडावदचे कुटूंब यातून सूटले असले तरी समाजात मूली मिळत नाही. मुलीला सरकारी नोकरी असलेला मूलगा हवा यातून व्यावसायिक व शेतकरी व इतर काम करणाऱ्या विवाह योग्य मूलांना मूली मिळत नाही; म्हणून पैसे देवून विदर्भासह इतर गावी अशा बोगस टोळीच्या मोहात अडकून फसवणूक होते पालकांनी अशा टोळी पासून सावध राहावे.

loading image
go to top