जळगाव जिल्‍ह्यात सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona recover

जळगाव जिल्‍ह्यात सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा (Coronavirus) बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे (Jalgaon corona update) बाधित झालेल्या १ लाख ३७ हजार १३६ रुग्णांपैकी १ लाख २५ हजार ५३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९ हजार १४३ ॲक्टीव्ह रुग्ण (Recover corona) उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.५४ टक्क्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचा मृत्युदर १.७९ टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector abhijit raut) यांनी दिली. (jalgaon district corona update news recover patient above one lakh)

हेही वाचा: ‘म्यूकरमायकोसिस’ मेंदूपर्यंत गेला तर रुग्ण दगावतो

आजपर्यंत १० लाख ६५ हजार ८३८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख ३७ हजार १३६ अहवाल पॉझिटीव्ह आले. ९ लाख २५ हजार २७० अहवाल निगेटिव्ह आले. सध्या १ हजार ६३५ अहवाल प्रलंबित आहेत. सध्या ६ हजार ८७१ रुग्ण होम क्वारंटाईन असून २८१ रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या ९ हजार १४३ रुग्णांपैकी ७ हजार ४२१ रुग्ण लक्षणे नसलेले तर १ हजार ७२२ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत.

हेही वाचा: अनोखी शक्कल..कर भरणाऱ्यांना मिळणार सोन्याची नथ

साडेचार लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ८४१ नागरीकांना कोरोनाचा पहिला डोस तर १ लाख १३ हजार २४७ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार नागरीकांचे लसीकरण सुरु असून सध्या ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण

शहर-३१ हजार १४, जळगाव ग्रामीण-४ हजार ९२३, भुसावळ-११ हजार ३२७, अमळनेर-८ हजार ४९५, चोपडा-१३ हजार ३७७, पाचोरा-४ हजार २६७, भडगाव-३ हजार ३५९, धरणगाव-४ हजार ९८०, यावल-४ हजार १०३, एरंडोल-६ हजार १००, जामनेर-८ हजार १३२, रावेर-५ हजार ३२८, पारोळा-४ हजार ४५४, चाळीसगाव-७ हजार ६५४, मुक्ताईनगर-४ हजार ३६९, बोदवड-२ हजार ५९९ व इतर जिल्ह्यातील-१ हजार ५२.

loading image
go to top