esakal | जिल्‍ह्यातील बाधितांपैकी निम्‍मे जळगाव शहरात
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रोजची संख्या वाढत आहे. दोन-तीन दिवस वगळता दररोज ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

जिल्‍ह्यातील बाधितांपैकी निम्‍मे जळगाव शहरात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून या आठ- दहा दिवसांत जवळपास पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. त्यात गुरुवारी आणखी ५९ रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३९ रुग्ण बरे झाले. तर एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. 
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रोजची संख्या वाढत आहे. दोन-तीन दिवस वगळता दररोज ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. चाचण्या कमी होऊनही रुग्ण अधिक आढळून येत असून पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. गुरुवारी आढळून आलेल्या ५९ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ५६ हजार १८३ झाली आहे. तर ३९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ३५६ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बळींची संख्या १३३४ झाली आहे. गुरुवारी अकराशेवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. 

जळगावात सर्वाधिक रुग्ण 
जळगाव शहरात कोरोना संसर्ग वाढतच आहे. दररोज विविध भागात रुग्ण आढळून येत असून त्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी पुन्हा शहरात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. गुरुवारी जळगाव शहरात १६, त्याखालोखाल चोपडा तालुक्यात १५, पारोळ्यात १३, भुसावळ ६, अमळनेर ४, पाचोरा २ असे रुग्ण आढळून आलेत.