esakal | हावडा एक्स्प्रेसमध्ये पुन्हा प्रवाशाचा मृत्यू; अमळनेर स्थानकावर मृतदेह उतरवत कोच सॅनिटायझेशन
sakal

बोलून बातमी शोधा

railway sanitisetion

हावडा एक्स्प्रेसमध्ये पुन्हा प्रवाशाचा मृत्यू; अमळनेर स्थानकावर मृतदेह उतरवत कोच सॅनिटायझेशन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमळनेर (जळगाव) : हावडा एक्सप्रेस (Hawda express) रेल्वेगाडीने प्रवास करीत असलेल्या इसमाचा कोरोना (Coronavirus) सदृश्य आजाराने गाडीतच मृत्यू झाला. सदर इसमाचा मृतदेह अमळनेर स्थानकावर उतरवून संपूर्ण कोच सॅनिटायझेशन करून त्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली. (Amalner railway station hawda express corona death)

हावडा अहमदाबाद एक्सप्रेस (क्रमांक ०२८३३) या गाडीने अब्दुल मलिक नावाचे इसम मंगळवारी (ता.४) सहकुटुंब प्रवास करीत असताना नंदुरबार ते अमळनेर प्रवासात त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना जीव घाबरण्याचा त्रास होऊ लागला, त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वे विभागास ही माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून अमळनेर रेल्वे विभागाच्या हेल्थ युनिटला स्थानकावर अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा: तो खुणावतोय ‘मी पुन्हा येईल’..नागरीकच देताय आमंत्रण

तपासणीत मृत झाल्‍याचे आढळले

अमळनेर रेल्‍वे स्‍थानकावर वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण बडगुजर व त्यांचे सोबत वरिष्ठ औषध निर्माता किरण शिंदे व रजनीश कुमार हे उपस्थित झाले. गाडी स्थानकावर आल्यानंतर डॉ. बडगुजर यांनी तपासले असता सदर व्यक्ती मयत झालेली आढळून आले. यामुळे सदर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी उतरवून अमळनेर ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला. यानंतर सफाई कर्मचारी संतोष नन्नवरे यांनी संपूर्ण कोचवर सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आणि त्यानंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली. यावेळी स्टेशन अधिक्षक एस. के. रॉय व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.