esakal | तो खुणावतोय ‘मी पुन्हा येईल’..नागरीकच देताय आमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

market crowd

तो खुणावतोय ‘मी पुन्हा येईल’..नागरीकच देताय आमंत्रण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमळनेर (जळगाव) : कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) ही पहिल्या लाटेपेक्षा किती भयावह आहे हे सर्वश्रुत आहे. आता कुठे दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी भीती अद्याप कायम आहे. १५ मे पर्यंत सरकारने लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलेला आहे; नियमांचे पालन काटेकोर झाले तर परिस्थिती अजून सुधारू शकते. (jalgaon news amalner market crowd in lockdown)

अमळनेरात सकाळी ७ ते ११ पर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू असतात यामुळे बाजारात एकाच वेळी मोठी गर्दी होते. अशा वेळी संसर्गाची भीती वाढतच आहे. प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून, नागरिकांकडून मात्र पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढेल ही भीती मात्र कायम आहे.

हेही वाचा: मंत्री गुलाबराव पाटील..स्वःताची पाठ थोपटून घेतायं !

लाट आटोक्‍यात पण

काही दिवसांपूर्वी खाजगी व सरकारी कुठल्याच दवाखान्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हते. आज मात्र थोडी परिस्थिती बदललेली असून दवाखाने व आरोग्य विभागावरचा ताण काही प्रमाणात का असेना कमी झालेला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची लाट शहरात व तालुक्यात आटोक्यात आलेली दिसत आहे.

हेही वाचा: मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

शटर बंद मात्र व्यवहार सुरू

दुकानांचे फक्त शटर बंद असले तरी आतून बरेच व्यवहार चालू असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.नगरपालिका व पोलीस प्रशासन बाजारपेठेत आल्यावर नियम मोडणाऱ्या दुकानदारांना दंड ठोकून कार्यवाही करत असले तरी ते ते माघारी फिरल्यावर परिस्थिती जैसे थे होते.

संख्या पुन्हा वाढली

मागील आठवड्यात कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढलेली दिसली. ग्रामीण भागात ११ तर शहरी भागात १८ रुग्ण आढळले.