rainfall
rainfallrainfall

जूनअखेरीस सरासरीपेक्षा कमी पाऊस; तीन प्रकल्पांत ठणठणाट

जूनअखेरीस सरासरीपेक्षा कमी पाऊस; तीन प्रकल्पांत ठणठणाट

जळगाव : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (ता. २८) सायंकाळनंतर दमदार हजेरी लावली. सुरवातीस जोरदार, तर नंतर मध्यम हलक्या सरींचा एक ते दीड तास वर्षाव सुरू होता. ठिकठिकाणी उंचसखल भागात पावसाचे पाणी साचले. दोन दिवसांपासून तुरळक, तर सोमवारी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Below-average-rainfall-at-the-end-of-June)

rainfall
पथदिव्यांची वीजबिले भरणार कोण?; ग्रामपंचायतींपुढे अडचणींचा डोंगर

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी १२ मिलिमीटर पाऊस झाला. बोदवड तालुक्यात ५५, तर सर्वांत कमी रावेर तालुक्यात ०.२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात १३९.२ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. तो ११२ झाला आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी

तालुका--सोमवारी झालेला पाऊस (कंसात आतापर्यंत झालेला पाऊस)

जळगाव-- २१.९ (१३४.९ मिलिमीटर)

भुसावळ-- ६.९ (१३७.२)

यावल--- ४.५ (१३५.४)

रावेर-- ०.२ (१४१.१)

मुक्ताईनगर-- ०.९ (१०५.५)

अमळनेर-- १२.१ (७६.६)

चोपडा-- ५.८ (६४.२)

एरंडोल-- ३२.० (१३२.२)

पारोळा-- २५.९ (२०३.५)

चाळीसगाव-- २५.७ (२०३.८)

जामनेर-- ३७.० (१६९.८)

पाचोरा-- २३.६ (१४१.१)

भडगाव-- २३.० (१४६.५)

धरणगाव-- ६.३ (१३६.२)

बोदवड-- ५५.०(१९९.४)

एकूण ः १७.७ (१३९.२)

rainfall
‘उमवि’चा अर्थसंकल्प; नंदुरबारच्या आदिवासी अकादमीसाठी कोटीची तरतूद

तीन प्रकल्पांत ठणठणाट

प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात १३९.२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद असली तरी सर्वदूर सारखा पाऊस झालेला नाही. प्रत्यक्षात ११२ मिलिमीटर पाऊस झाला. जमिनीतून पावसाचे पाणी वाहून निघालेले नाही. परिणामी सिंचन प्रकल्पात पाण्याची आवक नसल्याने जूनअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी ३०.८२ टक्के उपयुक्त साठा असून, अग्नावती, हिवरा व बोरी प्रकल्पांत ठणठणाट असल्याचे चित्र आहे.

धरण---जलसाठा (टक्केवारी)

गिरणा-- ३२.५०

हतनूर-- १६.९४

वाघूर--६०.२९

हिवरा--०

अग्नावती--०

बोरी--०

बहुळा-- २०.७४

अंजनी-- १६.८८

गूळ--२८

मन्याड-१३

भोकरबारी-- १५.३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com