घरातील सासू- सून, नणंद- भावजाईचे रण निवडणूकीच्या रिंगणात

सुधाकर पाटील
Tuesday, 5 January 2021

भडगाव तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायतींच्या ३०९ जागांसाठी ९४२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात सोमवारी माघारीनंतर ३९५ इच्छुकांनी माघार घेतली

भडगाव (जळगाव) : तालुक्यातील ३३ पैकी चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात मांडकी, पांढरद, पळासखेडे, लोण प्र. भ. यांचा समावेशक आहे. आता २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत आहे. काही ग्रामपंचायतींची बिनविरोध होण्याची संधी एक, दोन जागांमुळे हुकली आहे. जुवार्डी येथे चुलतसासू विरुद्ध सून व नणंद विरुद्ध भावजाई अशी समोरासमोर लढत आहे. 
भडगाव तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायतींच्या ३०९ जागांसाठी ९४२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात सोमवारी माघारीनंतर ३९५ इच्छुकांनी माघार घेतली तर याच वेळी १११ उमेदवार बिनविरोध निवडून आले. राहिलेल्या जागांसाठी ४२६ उमेदवार रिंगणात आहेत. 
तालुक्यातील पळासखेडे रुपनगर येथील ग्रामपंचायतीचे तीनही वॉर्डातील ९ उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आले आहेत. यात संगीताबाई पाटील, मंगलकोर पाटील, ललिता पाटील, परमेश्वर पाटील, आशा पाटील, भगवान भिल, सुनील पवार, प्रकाश जाधव, प्यारी जाधव यांचा समावेश आहे. बिनविरोध निवडीसाठी ग्रामस्थ गुलाब पाटील, विजय पाटील, भारत पाटील, बाबुराव पाटील, लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून नंदकिशोर बैरागी यांनी कामकाज पाहिले. 

बिनविरोध जागा
पंढरद ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली. त्यात गोकुळ भिल, सुशील भिल, द्वारकाबाई पाटील, मनीषा पाटील, बेबाबाई कोळी, तुषार पाटील, निर्माला पाटील यांचा समावेश आहे. मांडकी ग्रामपंचायतीतील सर्व ७ जागा बिनविरोध झाल्या असून, यात सुनील पगारे, किशोर पाटील, सुलक्षणा चौधरी, अशोक वाघ, सोनिया भिल, राहुल पाटील, अमृता चौधरी हे निवडून आले. तर लोण प्र.भ. ग्रामपंचायतीच्या सर्व ७ जागा बिनविरोध निवडून आल्या. यात प्रमिला माळी, विठाबाई पाटील, जिभाऊ पाटील, अशोक पाटील, सुनंदा पाटील, दिगंबर खवले, कविता पवार अशी नावे आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhadgaon gram panchayat election