भंगारातून मध्यरेल्‍वे झालेली मालामाल

चेतन चौधरी
Tuesday, 9 February 2021

झिरो स्क्रॅप मिशन मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेसाठी कमाई होत नाही; तर त्याचा परिणाम अतिरिक्त जागेची उपलब्धता देखील होते.

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने, मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभाग, कार्यशाळा, शेड इत्यादी परिसर भंगार सामग्रीपासून मुक्त व्हावे, यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केले. चालू वर्षात म्हणजेच एप्रिल -20 ते जानेवारी–21 दरम्यान मध्य रेल्वेने 224.96 कोटी भंगाराची विक्री केली. या भंगार सामग्रीमध्ये निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य, मोडीत काढलेले डबे,वाघिणी आणि इंजिने इत्यादींचा समावेश आहे.

इतका महसूल जमा
झिरो स्क्रॅप मिशन मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेसाठी कमाई होत नाही; तर त्याचा परिणाम अतिरिक्त जागेची उपलब्धता देखील होते. वर्ष 2019- 20 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने 56057.15 मे.टन वजनाच्या निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य आदि भंगार साहित्याच्या विक्रीतून रुपये 321.46 कोटी महसूल जमा केला होता.

सामग्री व्यवस्‍थापन विभागाची महत्‍त्‍पुर्णी भुमिका
कोविड -19 साथीच्या दरम्यान देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या व पार्सल गाड्यांच्या इंजिनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग व इतर लागणाऱ्या वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यात सामग्री व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पीपीई किट्स , एन-95 मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स इत्यादी वस्तू कर्मचाऱ्यांना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, त्यासाठी अल्प कालावधीत निविदा काढून खरेदी करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal central railway scrap sell