शेतऱ्यांच्या समर्थनार्थ किसान बाग आंदोलन

चेतन चौधरी
Thursday, 28 January 2021

देशाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. त्याला बरबाद करणारे तीन काळे कायदे जबरदस्तीने त्यांच्यावर लादले जात आहेत. शेतकर्‍यांच्या शेत मालाला हमी भाव मिळत नाही म्हणून देशाच्या राजधानी दिल्लीभोवती लाखो शेतकरी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे.

भुसावळ (जळगाव) : दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी वंचित संघटनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर ‘किसान बाग’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले.

आज देशाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. त्याला बरबाद करणारे तीन काळे कायदे जबरदस्तीने त्यांच्यावर लादले जात आहेत. शेतकर्‍यांच्या शेत मालाला हमी भाव मिळत नाही म्हणून देशाच्या राजधानी दिल्लीभोवती लाखो शेतकरी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. हाडे गोठवणार्‍या थंडीत ही चिवटपणे अनेक संकटाचा सामना करत सरकारला विनवणी करत आहे मात्र केंद्र सरकारच्या अहंकार आणि व्यापारी धार्जिण्या धोरणामुळे शेतकर्‍यांच्या न्याय मागणीस धुडकावले जात आहे. आज देशाचा पोशिंदा जगला तर आम जनतेस अन्न मिळेल तेच धान्य मुठभर व्यापारी घराण्याच्या गोदामात गेले तर जनता अन्न-अन्न करून तरफडून मरून जाईल अशी अवस्था होवू नये, शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात आले पाहिजे या साठी शेतकर्‍याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, हाजी मुश्ताक सैय्यद हाजी कमरुद्दी, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी शेख, जिल्हा संघटक सचिव शेख सलीम, हाजी कमरुद्दीन, हाजी सैय्यद अली, हाजी सलीम, हाजी तस्लीम, हाजी निसार, बाळा पवार, गणेश इंगळे, वंदना सोनवणे, संगीता भामरे, बंटी सोनवणे, रुपेश कुर्‍हाडे, सचिन सोनवणे, प्रमिला बोदडे, मीनाक्षी वाघोदे, लता सुरडकर, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन रणित, जिल्हा सचिव नागसेन सुरडकर, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, युसूफ सैय्यद, आसीम सैय्यद, कासीफ सैय्यद, अजहर सैय्यद, इमरान सैय्यद, मंजुर सैय्यद, नजमुद्दीन सैय्यद, खलील खान, रफिक खान, याकुब खान, फिरोज खान, सलमान सैय्यद, मउजेर शेख, फारूख शेख, खालीद शेख, तय्यब सैय्यद, हैदर सैय्यद आदी सहभागी झाले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal farmer strike protect kisan bag aandolan