esakal | प्रवाशांची गर्दी अन्‌ रेल्‍वेचा उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार
sakal

बोलून बातमी शोधा

railway

कोरोनामुळे गेल्‍या वर्षी अर्थात मार्च महिन्यापासून रेल्‍वेची प्रवाशी वाहतुक सेवा बंद होती. परंतु आता टप्प्या- टप्प्याने गाड्या सुरू होत आहेत. शिवाय कोरोनाचे लसीकरण मोहिम देखील सुरू झाल्‍याने प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.

प्रवाशांची गर्दी अन्‌ रेल्‍वेचा उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : देशभरात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे आता नवीन गाड्या सुरू केल्या जात असून काही उत्सव विशेष गाड्यांचा विस्तारही करण्यात आला आहे. 
कोरोनामुळे गेल्‍या वर्षी अर्थात मार्च महिन्यापासून रेल्‍वेची प्रवाशी वाहतुक सेवा बंद होती. परंतु आता टप्प्या- टप्प्याने गाड्या सुरू होत आहेत. शिवाय कोरोनाचे लसीकरण मोहिम देखील सुरू झाल्‍याने प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. मात्र रेल्‍वेतून प्रवास करताना आरक्षण असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. अर्थात आरक्षण करून प्रवाशी मार्गस्‍थ होत असल्‍याने वेटींग लिस्‍ट वाढत आहे. ही स्‍थिती पाहता रेल्‍वे प्रशासनाने गाड्या देखील वाढविण्यास सुरवात केली आहे.

अशा आहेत गाड्या
गाडी क्रमांक 06067 अप चेन्नई एगमोर- जोधपूर 6 फेब्रुवारी ते 27 मार्चपर्यंत (शनिवार) सुरु राहिल. गाडी क्रमांक 06068 डाउन जोधपूर-चेन्नई एगमोर 8 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत धावेल. ही गाडी बडनेरा, अकोला, शेगांव, भुसावळ, जळगांव येथे थांबेल. 
गाडी क्रमांक 06733 डाऊन रामेश्वरम- ओखा 5 फेब्रुवारी ते 26 मार्चपर्यंत धावेल. गाडी क्रमांक 06734 अप ओखा- रामेश्वरम 9 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावेल. या गाडीला मनमाड, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 
गाडी क्रमांक 03259 अप पटना- मुंबई 31 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत. गाडी क्रमांक 03260 डाउन 2 फेब्रुवारी ते 2 एप्रिल (दर मंगळवार, शुक्रवार) पर्यंत धाऊन भुसावळ येथे थांबेल. 
गाडी क्रमांक 02545 अप रक्सौल ते लोकमान्य टिळक टर्मिनस 28 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत (दर गुरुवार), गाडी क्रमांक 02546 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल 30 जानेवारी ते 27 मार्चपर्यंत (दर शनिवार) सुरू राहील. या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. 
गाडी क्रमांक 05547 अप रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस 25 जानेवारी ते 29 मार्चपर्यंत (दर सोमवार), गाडी क्रमांक 05548 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल 31 मार्चपर्यंत (दर बुधवार) धावेल. ही गाडी खंडवा, भुसावळ, मनमाड येथे थांबेल. 
गाडी क्रमांक 05267 अप रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस 27 मार्चपर्यंत (दर शनिवार), गाडी क्रमांक 05268 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल 1 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत (दर सोमवार) सुरू राहील. या गाडीला खंडवा, भुसावळ, नाशिक येथे थांबेल. 
गाडी क्रमांक 05563 अप जयनगर- उधना 25 मार्चपर्यंत (दर गुरुवार), गाडी क्रमांक 05564 डाऊन उधना जयनगर 28 मार्चपर्यंत(दर रविवार) धावेल. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगांव येथे थांबा देण्यात आला आहे. आरक्षणः पूर्णपणे आरक्षित विस्तारित उत्सव विशेष गाडी क्रमांक 03260, 02546, 05548 आणि 05268 साठी आरक्षण विशेष शुल्कासह संगणकीकृत आरक्षण केंद्रे व संकेतस्थळावर सुरु होईल. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image