esakal | प्रजासत्ताकदिनी किसान तिरंगा रॅलीसह रेल रोको; जिल्‍ह्‍यात दहा रेल्‍वे स्‍थानकांवर आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

rail roko

दहा रेल्वे स्थानकावर किसान तिरंगा रँली व रेल रोको आंदोलन दुपारी 2 वाजता करण्यात येणार असल्याचे पी.आर.पी.चे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी सांगितले.

प्रजासत्ताकदिनी किसान तिरंगा रॅलीसह रेल रोको; जिल्‍ह्‍यात दहा रेल्‍वे स्‍थानकांवर आंदोलन

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी भारतीय संविधान बचाव सेना व विविध दहा संघटनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनी मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानक तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध दहा रेल्वे स्थानकावर किसान तिरंगा रँली व रेल रोको आंदोलन दुपारी 2 वाजता करण्यात येणार असल्याचे पी.आर.पी.चे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे बनवले आहेत. ते काळे कायदे त्वरित रद्द करण्यात यावे; या मागणीसाठी भारतीय संविधान बचाव सेना व विविध दहा संघटनेच्यावतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवर रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठींबा दर्शविण्यात येणार आहे.

जिल्‍ह्‍यात दहा स्‍थानकांवर आंदोलन
मुंबईच्या सीएसटीवर रेल रोको करण्यात येणार असून, यासोबतच जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, रावेर, बोदवड, धरणगाव, सावदा, वरणगाव, निंभोरा इत्यादी रेल्वे स्टेशनवर किसान तिरंगा रॅली व रेल रोको आंदोलन दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे. यावेळी ठाणे डोंबिवली महानगर प्रमुख संदिप निकुंभ, पिआरपीचे ठाणे प्रमुख देवेंद्र कोयंडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, पि.आर.पी चे रावेर तालुका प्रमुख चंदु पहेलवान आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन ः राजेश सोनवणे