esakal | रेल्वे स्थानकावरील भिकाऱ्यांची झाडाझडती; चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस ॲक्शन मोडवर

बोलून बातमी शोधा

bhusawal junction
रेल्वे स्थानकावरील भिकाऱ्यांची झाडाझडती
sakal_logo
By
टिम इ सकाळ

भुसावळ (जळगाव) : भुसावळ हे रेल्वे जंक्शन (bhusawal railway junction) असून येथे दररोज सुमारे तीनशेच्या आसपास रेल्वे गाड्यांना थांबा आहे. यामुळे रेल्वेस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला भिकारी तसेच अनेक भटके मुले देखील आहेत. त्यापैकी बहुतेक भिक्षेकरी आणि मुले नशेच्या आहारी गेलेली आहेत. त्यांची पोलिसांकडून (police) माहिती घेऊन कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. (bhusawal robbery matter police action mode)

सध्या स्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही भिक्षेकरू तसेच नशेच्या आहारी गेलेली मुले भुसावळ शहरांमध्ये फिरतांना दिसून येत होती. लॉकडाऊन पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची दुकाने बंद असल्यामुळे या व्यक्तींकडून शहरात चोरीच्या घटना घडण्याची देखील शक्यता होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, एपीआय कृष्णा भोये, एपीआय हरीश भोये, त्याचप्रमाणे जीआरपी पीआय सरडे तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन स्टाफ व आरसीपी पथकाने केली आहे.

हेही वाचा: हॉटस्‌ॲप ग्रुपच्या नावाप्रमाणे जोपासली बांधिलकी; ३ लाख ८० हजार निधी संकलन

दुकाने फोडण्याचा प्रयत्न

मागील आठवड्यामध्ये भुसावळ शहरांमध्ये दुकाने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. शिवाय तीनच दिवसांपूर्वी दोन भिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादांमध्ये एक भिकारी जखमी देखील झाला होता. त्या संदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. शहरामध्ये गेल्या आठवड्यात दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेमध्ये हीच रेल्वेस्टेशन परिसरामध्ये फिरणारी व नशेच्या आहारी गेलेली मुले असल्याचे निष्पन्न झाले होते.

शहराबाहेर जाण्याची ताकीद

शिवाय सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापैकी जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची देखील शक्यता होती. या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांकडून रेल्वे स्थानक परिसरात तसेच भुसावळ शहरांमध्ये फिरणाऱ्या भिक्षेकरी तसेच नशेच्या आहारी गेलेल्या सुमारे ७० व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. या सर्व व्यक्तींना भुसावळ रेल्वे स्थानक परिसरामध्ये एकत्रित करण्यात आले. तेथे त्यांची सर्व माहिती घेण्यात आली. कोठून आले? भुसावळ शहरात नेमके कशासाठी आले? कधीपासून आले? भुसावळ शहरात कोठे राहतात? काय करतात? या सर्व बाबींची माहिती घेण्यात आली. त्यापैकी जे संशयित दिसून आले अशांना तात्काळ विहित मार्गाने भुसावळ शहर सोडून जाण्याची ताकीद देण्यात आली.

२९ जणांची कोरोना तपासणी

याचवेळी या व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा ह्या व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्यावर तात्काळ उपाय व्हावे, या दृष्टिकोनातून यातील २९ व्यक्तींची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली. पुढील काही दिवस सातत्याने वर नमूद व्यक्तीवर पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य घटनांना आळा बसू शकेल.