esakal | हॉटस्‌ॲप ग्रुपच्या नावाप्रमाणे जोपासली बांधिलकी; ३ लाख ८० हजार निधी संकलन

बोलून बातमी शोधा

social media

हॉटस्‌ॲप ग्रुपच्या नावाप्रमाणे जोपासली बांधिलकी; ३ लाख ८० हजार निधी संकलन

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : कोरोना महामारीच्या काळात अनेक ठिकाणी माणुसकी शून्य असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून येथील सोशल मीडियातील "माझं गाव माझं अमळनेर" या व्हॉट्सअप ग्रुपच्या (whatsaapgroup) माध्यमातून ३ लाख ८० हजार निधी संकलन केले. जमा झालेल्या रक्‍कमेतून ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला (covid center) आवश्यक असलेले उच्च दाब क्षमतेचे जनरेटर भेट दिले. कोविडच्या गंभीर साथीत अमळनेरकरांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. (social media whatsapp group help in hospital funding)

हेही वाचा: एकाच रूग्‍णाचे दोन रक्‍तगट; प्लाझ्मा देताना उडाला गोंधळ

जनरेटरचे लोकार्पण अमळनेरच्या प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, नर्मदा फाउंडेशनचे डॉ. संदीप जोशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर, व्हाट्सअप्प ग्रुपचे अँडमिन सुनिल भामरे यांचेसह ग्रुपमधील प्रमुख वर्गणीदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ग्रुपचे सात वर्षांपासून कार्य

सोशल मीडियातील 'माझं गांव माझं अमळनेर' हा ग्रुप मागिल सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सर्वाधिक सक्रिय आहे. प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी ग्रुपच्या समाजोपयोगी व उत्स्फूर्त कार्याचे कौतुक केले. या लोकार्पण कार्यक्रमासाठी शहरातील ग्रामिण रुग्णालयाचे डॉ ताळे यांनी ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत दिलेल्या जनरेटर देणगीमुळे संपुर्ण रुग्णालयाला, रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून रुग्णालयाच्या सेवा अधिक प्रभावीपणे देता येईल'असे सांगितले. तसेच जळगांव जिल्हा चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयला भेट दिली. तर नविन जनरेटर रुग्णालयास भेट मिळाल्याबद्दल माझं गाव माझं अमळनेर गृपचे आभार व्यक्त केले. अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनीही भेट दिली.