बस चालकाची सावधानता; म्‍हणून वाचला सर्व प्रवाशांचा जीव

अमोल अमोदकर
Friday, 8 January 2021

प्रवाशी घेवून जाणारी बस काही अंतरावर जाते आणि तोच बसचे स्‍टेअरींग लॉक झाल्‍याचे चालकाला समजते. भरधाव वेगाने निघणारी बस रस्‍त्‍याच्या कडेला जावून पलण्याची भिती होती. परंतु, चालकाने सावधानता दाखविली म्‍हणून बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.

बोदवड (जळगाव) : बोदवड- जळगाव बस (क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 1596) बोदवड बसस्‍थानकातून निघून जळगावी येण्यासाठी मार्गस्‍थ झाली. यावेळी बसमध्ये किमान 35 ते 40 प्रवासी होते. सर्व प्रवाशांवर संकट ओढवले होते. मात्र चालकाची सावधानता कामी आली.

जळगाव- बोदवड बस जळगावी परत येण्यासाठी बोदवड बसस्‍थानकातून चाळीस प्रवाशी घेवून निघाली. बसचे लक जगदीश देवचंद लोखंडे होते. बस मार्गस्‍थ झाली त्‍यावेळी रिमझिम पाऊस देखील सुरू होता. बस सुरवाडेमार्गे निघाली असताना सुरवाडे खुर्द गावाजवळ आली असताना रिमझिम पाऊस सुरु असताना प्रवासी गाडीतून उतरवण्यासाठी गाडीचा वेग कमी करून ब्रेक दाबला असता गाडीचे स्टेअरींग लाँक झाल्याचे चालक लोखंडे यांच्या लक्षात आली. यामुळे फिरविलेले स्‍टेअरींग बसला रस्त्याच्या बाजुने खोलगट भागात नेवून पलटी होवून मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती. यामुळे प्रवाशाचे प्राण देखील जाण्याची भिती होती.

प्रसगांवधान राखले
जिवावर बेतणारा प्रसंग होऊ शकत होता. मात्र वाहनचालक जगदीश लोखंडे यांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. बस चालक लोखंडे यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या बंद टँकर ट्रॉलीवर बस ठोकली. यात गाडीच्या समोरील बाजुच्या काचा फोडल्या गेल्या. यामुळे साधारण 25 हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र प्रवाशांचा जीव वाचू शकला. घटनेबाबत चालक लोखंडे यांनी वरीष्ठांशी चर्चा करून बोदवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bodwad parivahan bus accident passenger safe