दोन्ही पालक गमाविलेल्यांचे आधारसिडींग सुरू

दोन्ही पालक गमाविलेल्यांचे आधारसिडींग सुरू
Aadhar seeding
Aadhar seedingsakal

जळगाव : जिल्ह्यात कोरोना महामारीत (Coronavirus) दोन्ही पालक (आई, वडील) गमाविलेली १२ बालके आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ४५० बालक कोरोनामुळे एक पालक (Corona death) गमाविलेली आहेत. दोन्ही पालक गमाविलेल्यांना शासकीय मदत देण्यासाठी त्यांच्‍या घरी जावून त्यांचे संगोपन कोण करतेय, त्यांचे मनोबल वाढेल, त्यांना इतर सुविधा काय देता येतील याबाबत माहिती घेण्यात आली आहे. १२ बालकांपैकी जी बालके १८ वर्षाआतील आहे; अशांना शासकीय मदत देण्यासाठी त्यांचे आधारकार्ड सिडींग करण्याचे कामे सुरू असल्याची माहिती (District Women and Child Development) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली. (jalgaon-Both-parents-continue-to-support-father-mother-in-corona-death-child)

Aadhar seeding
शेतकऱ्याच्‍या समस्‍या सोडविण्यात सरकार अपयशी : गिरीश महाजन

कोरोना महामारीने दोन पालक, एक पालक गमाविलेल्यांबालकांसाठी जिल्हा कृती दल जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे. या समितीचे पदाधिकारी पालक गमाविलेल्यांचा आधार बनत आहे. त्यासाठी अशा बालकांना जावून भेटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, आता व भविश्‍यात काय अडचणी त्यांच्यासमोर आहेत, त्यासोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे.

आठ दिवसात माहिती गोळा करणार

एक पालक गमाविलेल्या ४५० बालकांपैकी २०० बालकांच्या घरी आगामी आठ दिवसात जावून त्यांची इत्यंभूत माहिती गोळा करून त्यांना कशा प्रकारे शासकीय, सामाजीक संस्थाद्वारे मदत मिळवून देता येईल याबाबत समिती निर्णय घेणार आहे. त्यांच्या संगोपनाविषयी बाल संगोपन योजना लागू करून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. शिक्षणासाठी त्यांना जी मदत लागेल तीही मिळवून दिली जाणार आहे. जी मुले अठरा वर्षावरील आहे अशांसाठी सामाजीक संघटनांना एकत्र करून त्यांना मदतीची दिशा ठरविली जाईल. विशेष करून या सर्व बालकांना सुरक्षितता आहे का ? हे पाहून ती अगोदर देण्याचा प्रयत्न असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com