
अडीच हजाराची लाच भोवली; पोलिस नाईकसह होमगार्ड जाळ्यात
जळगाव : गुन्ह्यातील वारंटच्या कामी सकारात्मक मदत तसेच दारु विक्रीच्या व्यवसायात पुन्हा कारवाई करणार नाही. या अटीवर लाचेची मागणी करणे पोलिस नाईक व होमगार्ड या दोघांना महागात पडले. पाळधी दुरक्षेत्र येथे कार्यरत किरण चंद्रकांत सपकाळे व प्रशांत नवल सोनवणे या दोघांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले. (bribe-two-and-a-half-thousand-rupees-Homeguard-nets-with-police-nike)
पाळधी दुरक्षेत्र येथे कार्यरत पोलिस नाईक किरण सपकाळे यांनी २ हजार ५० रुपयांच्या लाचेची मागगी केली. तर ती रक्कम होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे याने स्विकारली. पंचासमक्ष हा प्रकार उघड होताच दबा धरुन बसलेल्या जळगाव एसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. पोलिस उपअधिक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी आदींनी या कारवाई पथकात सहभाग होता.
हेही वाचा: प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष देत अत्याचार
कारवाई न करण्यासाठीची लाच
तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करणेकामी व तक्रारदार यांच्या दारू विक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष अडीच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम किरण सपकाळे यांचे सांगणेवरून प्रशांत सोनवणे यांनी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पंचासमक्ष स्वीकारताना आढळून आले.
Web Title: Marathi Jalgaon News Bribe Two And A Half Thousand Rupees Homeguard Nets With Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..