प्रेमाच्‍या जाळ्यात ओढून लग्‍नाचे आमिष देत अत्‍याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमाच्‍या जाळ्यात ओढून लग्‍नाचे आमिष देत अत्‍याचार

प्रेमाच्‍या जाळ्यात ओढून लग्‍नाचे आमिष देत अत्‍याचार

वरणगाव (जळगाव) : तालुक्यातील टहाकळी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीला गावातीलच एका तरूणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार शारिरीक संबध प्रस्थापित केले. तसेच तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणाविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. (varangaon-young-girl-atrocities-luring-marriage-bhusawal-police-fir)

हेही वाचा: ‘त्यांना’ ३८ वर्षांनंतर मिळाली स्वमालकीची जमीन

भुसावळ तालुक्यातील टहाकळी गावात राहणारी २४ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह राहते. शेती काम करून आपल्या कुटुंबाला हाथ भार लाऊन आर्थीक मदत करते. दरम्‍यान संशयित आरोपी दिनेश उर्फ दिनकर मोतीराम कुंभार (वय २५, रा. टहाकळी ता. भुसावळ) याने तरूणीला आपल्या प्रेमाच्‍या जाळ्यात ओढून शारीरीक संबध प्रस्थापित केले. तसेच लग्नाचे खोटे आमिष दाखवत १० ते १२ वेळा टहाकळी शिवारातील जंगल भागात वारंवार अत्याचार केला.

तरच तुझ्याशी लग्‍न करेन म्‍हणून सांगितले

सदरचा घडलेला प्रसंग कोणाला सांगायचा नाही; असे केले तरच तुझ्याशी लग्न करेल असे तरूणाने सांगितले. मात्र दिनेश कुंभार घडलेला विषयच लक्षात घेत नसल्यामूळे आपली फसवणूक होत असल्याचे पीडितेला कळताच तरूणीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणाविरुद्ध फिर्याद दाखल केली. संशयित आरोपी दिनेश कुंभार याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगरचे विभागीय पोलिस अधिकारी डीवायएसपी विवेक लवांड करीत असुन सशंयीत पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे.

Web Title: Marathi Jalgaon News Varangaon Young Girl Atrocities Luring Marriage Bhusawal Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..