esakal | कोरोनातही त्‍यांनी तारले एक हजार परिवार; बेरोजगारांच्या हाताला दिला रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

bhojraj punshi

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याचे उदाहरणे आहेत. मात्र चाळीसगावचे उद्योजक भोजराज पुन्शी यांनी आपल्याकडे कामगार म्हणून असलेल्या बेरोजगार तरूणांसह त्यांच्या कुटुंबीयांना कोराना काळात वाऱ्यावर न सोडता खंबीर साथ दिली.

कोरोनातही त्‍यांनी तारले एक हजार परिवार; बेरोजगारांच्या हाताला दिला रोजगार

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : कोरोनाच्या कालावधीत माणूस माणसापासून दुर जात असताना सुमारे एक हजाराच्यावर व्यक्तींचे पालन पोषणाची जबाबदारी घेत त्यांना रोजगार देण्याचे काम चाळीसगावातील उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांनी केले आहे. माणुसकी, समाजहिताबरोबर रोजगारनिर्मिती व विकासकामासाठी हातभार लावण्याचे काम देखील यातून झाले. यामुळे पुन्शी यांच्या या दातृत्वाचे आणि कर्तुत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चाळीसगाव तालुक्यात आजही अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्यातच कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याचे उदाहरणे आहेत. मात्र चाळीसगावचे उद्योजक भोजराज पुन्शी यांनी आपल्याकडे कामगार म्हणून असलेल्या बेरोजगार तरूणांसह त्यांच्या कुटुंबीयांना कोराना काळात वाऱ्यावर न सोडता खंबीर साथ दिली. त्यामुळेच सुमारे एक हजााराच्यावर असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला कोरानाच्या भीषण परीस्थितीतही श्री. पुन्शी यांनी काम दिले. तालुक्यातील बेरोजगार असलेल्या तरूणांच्या हाताला चांगले काम मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या सर्व जबाबदारी सांभाळत असतांना श्री पुन्शी यांना या कामात त्यांचा पुतण्या विनोद पुन्शी व राज पुन्शी याचबरोबर मुलगा जितेंद्र पुन्शी याची देखील चांगली मदत होते.

पाचशे तरुणांच्या हाताला काम
एरंडोल- येवला राज्यमार्गाचे काम होत असल्याने या रस्त्यामुळे वाहतुक अधिक गतीमान होणार आहे. नाशिक जिल्ह्यात विषेशत: नांदगाव, मालेगाव जाणे सोपे होणार आहे.एरंडोल ते सायगाव या 106 कीमी अतंर असलेल्या कामावर देखील खेड्यातील पाचशेहून अधिक तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. मागील वर्षी 22 मार्चला महाराष्ट्र राज्यात लाँकडाऊन झाले होते. यावेळी श्री पुन्शी यांच्याकडे वाहणावर असलेल्या झारखंड, बिहार या राज्यातील वीस कामगारांना हाताला काम नसल्याने कांमावरुन घरी जावे लागेल अशी भिती होती. मजुरांसोबत असलेल्या ईतर कुठल्याही कामगाराचा पगार कापला नाही. विशेष या बाहेरील राज्यातील चालकांची प्रकृती व जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी केवळ नऊ दिवस कांम बंद झाले होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोशलडीस्टीग ठेवुन आज देखील काम सुरु असल्याचे श्री पुन्शी यांनी 'सकाळ' शी बोलतांंना सांगितले.

जलदूत ठरले भोजराज पुन्शी 
पुन्शी यांनी दोन वर्षापुर्वी व आजही उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या काळात त्यांच्या चाळीसगाव- धुळे रसत्यावरील डांबर प्लाँटवरील बोअरवेलचे पाणी आजुबाजुच्या लोकवस्तीतील लोकांना पिण्यासाठी पुरवतात. यामुळे ते जलदुत देखील ठरले आहेत. आज त्यांचा मजुरांवर पगाराचा खर्च 40 लाखाच्या आसपास होत असल्याचे श्री. पुन्शी यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले.मजुरांच्या सुख दुखात धावून जातात त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

माझ्याकडे असलेले कामगार म्हणजे जणू माझ्या कुटुंबातील आहेत. आज कोरोनाच्या सकंटात मी माझ्या सर्व कामगार बांधवाची काळजी घेत आहे. अशा परीस्थितीत बहुतेक ठिकाणी हाताला काम नाही. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत माझ्याकडील कामगांराच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, त्यातच मी समाधान आहे.
- भोजराज पुन्शी, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक चाळीसगाव

loading image