esakal | डोळ्यादेखत मुलगा गेला..अथांग पाण्यासमोर सेल्‍फीचा मोह; पाय घसरला अन्‌
sakal

बोलून बातमी शोधा

girna dam boy death

धरणात अथांग पाणी असल्याने नयनला त्याचा स्वतःचा पाण्यासह सेल्फी काढायचा होता. धरणाच्या उतारावर एका कठड्यावर उभा राहून तो सेल्फी काढत

डोळ्यादेखत मुलगा गेला..अथांग पाण्यासमोर सेल्‍फीचा मोह; पाय घसरला अन्‌

sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : गिरणा धरणावर मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात येथील २३ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली. धरणाच्या पाण्यात बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह मोठ्या अथक परिश्रमानंतर सोमवारी (ता. ४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास धरणातून बाहेर काढण्यात यश आले.  
रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटीचे माजी अध्यक्ष तथा स्वागत मेडिकलचे मालक रवींद्र शिरुडे हे मुलगा नयन (वय २३), लहान मुलगा वेदांत, तसेच दुकानातील कर्मचारी तक्षय ठोंबरे, अमोल कोठावदे, जयपाल पवार, राजेंद्र मराठे, रवींद्र देशमुख व चालक संदीप पाटील यांच्यासह रविवारी (ता. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास गिरणा धरणावर फिरण्यासाठी गेले होते. गाडी पार्क केल्यानंतर सर्व जण धरणावर फिरण्यासाठी निघाले. 

धरणातील अथांग पाणी आणि सेल्‍फी
धरणात अथांग पाणी असल्याने नयनला त्याचा स्वतःचा पाण्यासह सेल्फी काढायचा होता. धरणाच्या उतारावर एका कठड्यावर उभा राहून तो सेल्फी काढत असताना त्याचा कठड्यावर तोल गेला व तो थेट धरणाच्या पाण्यात बुडाला. हा प्रकार इतरांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड करून बचावासाठी धावा केल्या. मात्र, सायंकाळची वेळ असल्याने धरणावर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. शिवाय, येथील लाइफगार्डही घरी निघून गेले होते. त्यामुळे कोणालाच काही करता आले नाही. 

डोळ्यांदेखत मुलगा गेला 
रवींद्र शिरुडे यांचा मुलगा नयन हा त्यांच्या डोळ्यांदेखत पाण्यात बुडाला. धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने व सायंकाळ झाल्यामुळे अंधारही पडू लागल्याने नयनचा शोध घेता आला नाही. सोमवारी सकाळी मालेगाव महापालिकेतील अग्निशमन दलाचे जवान शकील अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार तासांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास धरणातून नयनचा मृतदेह बाहेर काढला. चाळीसगावला सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे