Father's Day : सद्‍गुणांची खाण, घराण्याची शान, बाप आमचा महान!

सद्‍गुणांची खाण, घराण्याची शान, बाप आमचा महान!
Fathers day
Fathers dayFathers day

चाळीसगाव (जळगाव) : कुटुंबातील प्रत्येकासाठी (Father's day) झिजणाऱ्या बापाचे गुणगान गायले जात नसले तरी बापाचे महत्त्व कमी होत नाही. कुठल्याही कुटुंबाच्या प्रगतीत आईचा सहभाग असला तरी बापाचाही सिंहाचा वाटा असतो. त्यामुळेच ‘रूपवान खास, सदगुणांची खाण, घराण्याची शान, बाप माझा’ या अभंगाच्या ओळी शून्यातून प्रगती साधणाऱ्या केशव रामभाऊ कोतकर यांना तंतोतंत लागू पडतात. लहानपणापासूनच मोठे कष्टमय जीवन जगत शून्यातून कुटुंबीयांना यशाच्या शिखरावर नेणारा असा बाप आपल्याला जन्मोजन्मी लाभावा, अशी देवापुढे प्रार्थना करणाऱ्या चारही मुलांचे कर्तृत्व समाजासाठी आदर्शवत ठरले आहे. (jalgaon-chalisgaon-kotkar-family-fathers-day-story)

चाळीसगाव आणि ‘नंदन’चा पेढा, हीदेखील या शहराची वेगळी ओळख आहे. मुंबई- पुणे असो की अन्य कुठल्याही बाहेरगावची पाहुणे मंडळी असो, चाळीसगावला आल्यानंतर ‘नंदन’च्या पेढ्याच्या आस्वाद घेतल्याशिवाय राहात नाही. या पेढ्याला लौकिक प्राप्त करून देण्यामागे ‘नंदन’चे सर्वेसर्वा केशव कोतकर यांचे कष्ट आहे. गोंडगाव (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी असलेले केशव कोतकर यांचे बालपण कष्टमय गेले.

Fathers day
महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी चार हजार किलोमीटरची पदयात्रा

दुध व्‍यवसायाची सुरवात

दुधाच्या व्यवसायाची सुरवात करून त्यांनी सुरवातीला दूध संकलनाचे काम केले. खेड्यापाड्यातून दूध संकलन करीत दोन पैसे आल्यानंतर चाळीसगावात गणेश डेअरीच्या रूपाने आपल्या व्यवसायाची मुहूतमेढ रोवली. अशा कष्टमय जीवनात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या केशव कोतकरांनी आपल्या चारही मुलांना व्यवसायातही पारंगत केले. भावाकडे गणेश डेअरची जबाबदारी सोपवल्यानंतर ‘नंदन’ नावाने कचेरीसमोर डेअरी सुरू करून अल्पावधीतच प्रगती साधली. ‘नंदन’च्या पेढ्यामुळे तर चाळीसगावची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.

कुटुंबीयांचे आधारस्तंभ

केशव कोतकरांनी आपल्या चारही मुलांना सुसंस्कारीत केले असून, त्यांची चारही मुले आपापल्या क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर पोचली आहेत. ज्येष्ठ चिरंजीव अनिल हे ‘नंदन’चा चाळीसगावला कारभार सांभाळतात. संजय, श्‍यामकांत व मनोज या तिन्ही मुलांनी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात प्रगती साधली असून, यासोबतच आपल्या पारंपरिक डेअरी व्यवसायाचाही विस्तार केला आहे. ज्यामुळे नाशिक व पुणे येथे ‘नंदन’च्या शाखा सुरू झाल्या आहेत. कोतकर कुटुंबीय आजही त्यांची चारही मुले, त्यांच्या बायका, नातवंडे एकत्र व गुण्यागोविंदाने राहतात. केशव कोतकर यांच्या कुटुंबात पत्नी वत्सलाबाई, चार मुले, चार सुना व नातवंडे असा मिळून २० जणांचा परिवार आहे. केशव कोतकर हे या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत.

Fathers day
बेतले होते जीवावर पण निभावले शिंगांवर!

सामाजिक कार्यात अग्रेसर

केशव कोतकर यांनी व्यवसायातून आर्थिक प्रगती साधताना सामाजिक बांधिलकीदेखील जोपासली आहे. त्यांच्या आदर्श शिकवणीमुळेच त्यांचे मोठे चिरंजीव अनिल कोतकर यांनी शहरातील फुले कॉलनी भागात तब्बल ४२१ झाडे लावली. केवळ झाडे लावली नाही, तर ती यशस्वीरित्या जगवली. ज्यामुळे हा परिसर सध्या आदर्शवत ठरला आहे. समाजात कुठलेही सामाजिक कार्य असले तरी कोतकर कुटुंबीयांकडून मदतीचा हात दिला जातो.

आमच्या वडिलांच्या शिकवणीमुळेच आमच्यावर जे काही संस्कार झाले, त्यातूनच आम्हा मुलांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आमचे वडील आमचे आदर्श आहेत.

-अनिल कोतकर, चाळीसगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com