बेतले होते जीवावर पण निभावले शिंगांवर!

पडक्या विहिरीचा पाण्याचा ठाव घेत सर्प नसल्याची खात्री करत दोन जण विहिरीत उतरले
बेतले होते जीवावर पण निभावले शिंगांवर!
Updated on

गणपूर(ता चोपडा) : येथील अशोक देवराम पाटील (शिवा आण्णा) यांच्या मालकीची बैलजोडी शेतात चरत असतांना एका बैलाने (Bull) दुसऱ्या बैलाला मारले. आणि तो बैल विहिरीत (Well) पडला. जीवावर बेतले आणि शिंगांवर निभावल्याने शेतकरी (farmer) व ग्रामस्थांनी (villagers) या बैलाला सहीसलामत बाहेर काढले. (villagers rescued the ox that fell into the well)

बेतले होते जीवावर पण निभावले शिंगांवर!
बिबट्याने अचानक मारली उडाली..आणि जीवाचा झाला थरथराट!

गणपुर येथील अशोक पाटील पाटील यांच्या शेतात दोन्ही बैल विहिरीच्या बाजूला चरत असतांना एका बैलाने दुसऱ्याला शिंगाने मारले. दुसऱ्या बैलाचा तोल गेला आणि आणि खोल विहिरीत पडला. संकट मोठे होते पाऊण लाखाच्या जोडीतला बैल म्हणजे पस्तीस ते चाळीस हजाराचे जनावर होते.

आणि गावकरी धावून आले..

मात्र वार्ता समजताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. पडक्या विहिरीचा पाण्याचा ठाव घेत सर्प नसल्याची खात्री करत दोन जण विहरीत उतरले. पूर्वी लोखंडी नांगराने नांगरणी करतांना बैलांसाठी वापरल्या जाणाऱ्या जुवार्डीचा वापर करून बैलाला दोरखंडाने बांधून दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने हळू हळू बैलाला वर काढण्यात यश आले.

बेतले होते जीवावर पण निभावले शिंगांवर!
महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी चार हजार किलोमीटरची पदयात्रा

पाईपांचा प्रयोग यशस्वी

विहिरीचा वापर बंद असल्याने डिलीवरीच्या दोन पाईपांना वर ठेऊन त्यावर नाडा टाकून हा प्रयोग यशस्वी झाला. बैलाचे नशीब बलवत्तर, बेतले होते जीवावर पण एक शिंग निघाले व दुसरे हलत असल्याने काढावे लागले. मात्र जीव वाचला असून बैल ठणठणीत आहे हे विशेष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com