esakal | लग्‍नसोहळ्यात धडकले पथक; वऱ्हाडींमध्ये उडाली खळबळ

बोलून बातमी शोधा

marriage

लग्‍नसोहळ्यात धडकले पथक; वऱ्हाडींमध्ये उडाली खळबळ

sakal_logo
By
टिम इ सकाळ

चाळीसगाव (जळगाव) ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने ठरवून काही नियम ठरवून दिले आहेत. प्रामुख्याने गर्दी टाळण्यासाठी लग्‍नसमारंभांवर निर्बंध लावत २५ जणांच्या उपस्‍थितीस मान्यता देण्यात आली आहे. असे असताना क्षमतेपेक्षा जास्‍त नागरीक असणाऱ्या सोहळ्यावर कारवाई करत दंड आकारण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील कन्नडरोड लगत असलेल्‍या कमलशांती पॕलेस मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. लासूर (औरंगाबाद) येथील विवाह सोहळा बुधवारी (ता.२८) होता. या सोहळ्याच्या ठिकाणी महसुल, नगरपालिका व पोलिसांचे पथक धडकले. पथक आल्‍याने वर आणि वधूकडील मंडळींमध्ये अचानक खळबळ उडाली. पथकाने ५० हजाराच्या दंडाची आकारणी करुन कारवाई केली.

दीडशे लोकांची उपस्‍थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील सूर्दशन जैस्वाल यांच्या कुंटूंबातील विवाह सोहळा बुधवारी दुपारी कमलशांती पॕलेस मंगल कार्यालयात होता. यासोहळ्यात २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची खबर कोरोना प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. जवळपास १५० ते १६० वऱ्हाडी उपस्थित असल्याचे आढळून आले.

मंगल कार्यालयास यापुर्वीच दंड

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या निर्देशात विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक व्यक्तिंना उपस्‍थिती नाकारली आहे. असे असताना लग्‍नसोहळ्यात २५ हून अधिक उपस्थित नागरीकांमुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. यामुळे पथकाने विवाह सोहळा आयोजकांकडून ५० हजाराचा दंड वसूल केला. विशेष म्‍हणजे मंगल कार्यालयाच्या मालकांकडूनही दोन दिवसांपूर्वी पाच हजाराचा दंड पथकाने वसूल केला असताना मंगल कार्यालयात शंभरहून अधिक नागरीकांच्या उपस्‍थितीत विवाह सोहळा होत होता.