esakal | कर्करोगाने पिडीत चिमुरडी..कोरोनाशी लढली अन्‌ जिंकली

बोलून बातमी शोधा

littel girl corona positive
कर्करोगाने पिडीत चिमुरडी..कोरोनाशी लढली अन्‌ जिंकली
sakal_logo
By
टिम इ सकाळ

चाळीसगाव (जळगाव) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीवन संपले..अनेकांची कुटुंबच उध्वस्‍त झाली. पण या महामारीत जीवन मरणाच्या लढाईत जिंकत सुखरूप घरी गेले. अशाच एका चिमुकलीच्या लढाईची कहाणी. यकृताच्या कर्करोगाने ग्रस्‍त असलेल्‍या चिमुकलीने कोरोनाची लढाई देखील जिंकली.

चाळीसगावामधील यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त चिमुरडी आठवड्यापूर्वी रुग्णवाहिकेत शेवटच्या घटका मोजत होती. चिमुरडीला वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन नसले तरी फक्त साधा बेड तरी उपलब्ध करून द्या, अशी याचना तिच्या पालकांनी चाळीसगाव विकास मंचाकडे केली.

बेड नसल्‍याने सर्वत्र नकार पण..

चिमुकलीला अगोदरच यकृताच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्यात कोरोना झाला, अशा स्थितीत बेड मिळणे कठीणच होत. तिच्या पालकांनी बेड मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र सर्वत्र नकार दिला जात होता. अखेर पाचोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अमित साळुंखे यांनी एक स्टोअर रूम स्वछ करून तिला भरती केले.

ना रेमडेसिव्हीर ना व्हेंटिलेटर..चिमुकली सुखरूप

आठवड्यात डॉ. अमित आणि त्याच्या टीमने अथक प्रयत्न करून परीवर उपचार केले. विशेष म्हणजे परीला कुठलाही रेमडिसिव्हरचं इंजेक्शन दिल नाही. किंवा तिला व्हेंटिलेटर देखील लावले नाही. केवळ ऑक्सिजन लावण्यात आला होता. तरी देखील परी पूर्णपणे बरी झाली असून परीला तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल आहे. परीची आई आणि आजोबादेखील यात कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.