चाळीसगावला आरटीओ कार्यालयासाठी शिवसेनेचे उपोषण

बापू शिंदे
Wednesday, 27 January 2021

चाळीसगाव तालुका जळगाव जिल्ह्यातील शेवटचा तालुका असल्याने आरटीओ कार्यालयाच्या कामासाठी येथील रहिवाशांना सुमारे शंभर किमीच्या फेऱ्या माराव्या लागतात. याशिवाय इतरही अनेक जिल्ह्यात दोन आरटीओ कार्यालय कार्यान्वित झालेले आहेत

तरवाडे (ता. चाळीसगाव) ः चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते भिमराव खलाणे उपोषणास बसले आहेत.
चाळीसगाव तालुका जळगाव जिल्ह्यातील शेवटचा तालुका असल्याने आरटीओ कार्यालयाच्या कामासाठी येथील रहिवाशांना सुमारे शंभर किमीच्या फेऱ्या माराव्या लागतात. याशिवाय इतरही अनेक जिल्ह्यात दोन आरटीओ कार्यालय कार्यान्वित झालेले आहेत त्याचप्रमाणे येथील भिमराव खलाणे यांनी उपप्रादेशिक कार्यालय होण्यासाठी 2007 पासून सतत शासनाकडे पत्र व्यवहार करत आहे 2021 उजाडले आहे. तरी देखील कोणीही दखल घेतली नाही. तसेच महसूलबाबत चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व पारोळा या चार तालुका मिळुन महिन्याला साडेपाच कोटी महसूल मिळत असतो. म्हणून शासनाचे देखील नुकसान नाही. 

दोन राज्‍यांच्या सीमा जोडलेल्‍या
चार जिल्ह्याचे ठिकाण आहे व दोन राज्यांची सीमा देखील जवळ आहे. जर एखाद्या रिक्षा मालक किंवा ट्रक मालक या व्यावसायिक बांधवांना आरटीओच्या कामासाठी जळगाव येथे जावे लागते. गेल्यानंतर एका दिवसात काम होईलच याची खात्री नसते. परंतु या गरीब व्यावसायिक बांधवाला त्या वाहनाचे पासिंग केल्याशिवाय पर्याय नसतो. जर यांचा आर्थिक किंवा मानसिक त्रास बघीतला तर अतिशय वाईट आहे. तसेच एखाद्या एकत्रित कुटुंबातील महिलेच्या नावावर वाहन असेल, तर त्या महिला भगिनींना दुसऱ्याच्या नावावर ते वाहन करायचे असेल; तर त्यांना देखील जळगाव जावे लागते. म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणे गरजेचे आहे; ह्या मागणीसाठी चाळीसगाव शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख येथील भिमराव खलाणे हे उपोषणासाठी बसलेले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon rto office shiv sena strike