esakal | कठीणाला सोपे करणारे पन्नाशी पार तरूण; सायकलींगमध्ये केला विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

cyclist

औरंगाबाद येथे जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे 400 किमी सायकलिंग स्पर्धेचे (बीआरएम स्पर्धा) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबाद- देवघाट- मांजरसुंभा आणि पुन्हा याच मार्गाने औरंगाबाद असे एकूण 400 किलोमीटरचे अंतरपूर्ण करण्यासाठी २७ तासाचा टास्क देण्यात आला होता.

कठीणाला सोपे करणारे पन्नाशी पार तरूण; सायकलींगमध्ये केला विक्रम

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : चाळीसगाव शहरातील सायकलस्‍वारांनी अवघ्या २४ तासात ४०० किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे तिघे सायकलिस्ट हे ४२, ४५ आणि ५९ वर्षीय असून त्यांनी केलेली कामगिरी तरुणांनाही लाजवणारी आहे. 

औरंगाबाद येथे जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे 400 किमी सायकलिंग स्पर्धेचे (बीआरएम स्पर्धा) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबाद- देवघाट- मांजरसुंभा आणि पुन्हा याच मार्गाने औरंगाबाद असे एकूण 400 किलोमीटरचे अंतरपूर्ण करण्यासाठी २७ तासाचा टास्क देण्यात आला होता. या स्पर्धेत चाळीसगाव येथील टोनी पंजाबी, अरुण महाजन आणि रवींद्र पाटील यांनी सहभाग नोंदविला. 

कडाक्‍याच्या थंडीतही अवघे २४ तास
हौशी सायकलपटू असलेल्‍या चाळीसगावच्या तिघांनी स्पर्धेत दिलेले अंतर 27 ऐवजी अवघ्या 24 तासात पूर्ण केले. विशेष म्‍हणजे कडाक्‍याची हाडे गोठविणारी थंडी असताना देखील तिन्ही सायकलपटूंनी स्पर्धेत यश मिळविले. औरंगाबाद शहरातून पहाटे सहाला स्‍पर्धेला सुरवात करत देवघाटकडे मार्गक्रमण केले. त्यानंतर स्‍पर्धा पुर्ण होईपर्यंत अर्थात 24 तास सायकल चालवतच राहिले. यामुळेच अवघ्या 24 तासात ४०० किमीचे अंतर पार करण्याचा किर्तीमान त्‍यांनी रचला. विशेष म्‍हणजे रात्रीच्या थंडीतही लक्ष गाठण्यासाठी रस्‍त्‍यावरून सायकलचे पायडल फिरत राहिले. 

दररोज ५० किमी सायकलिंग
चोवीस तासात ४०० किमी अंतर पुर्ण करणारे टोनी पंजाबी, अरुण महाजन आणि रवींद्र पाटील हे रोज ५० किमी अंतर सायकलिंगचा सराव करतात. टोनी पंजाबी हे व्यावसायिक, रवींद्र पाटील स्टेट बँकेच्या कृषी शाखेत वाहनचालक तर अरुण महाजन पिलखोड येथे पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. आपल्‍या कामातून वेळ काढत रोज पहाटे सराव करण्याचा त्‍यांचा नित्‍यनियम आहे. तिघाही सायकलपटूंनी यापुर्वी धुळे ते मालेगाव आणि धुळे ते शिरपूर असे 200 किलोमीटर अंतर त्यांनी साडेनऊ तासात पूर्ण केले होते. 

लक्ष्य सहाशे किमी 
चारशे किमीची स्‍पर्धा पार केल्‍यानंतर आता तिघांनी सहाशे किमीचे लक्ष ठेवले आहे. शनिवारी (१३ फेब्रुवारी) ६०० किमी अंतराची स्पर्धा होत आहे. यात तिघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेसाठी ४० तासांचा दिलेला वेळेच्या आतच पुर्ण करण्याचा विश्‍वास आहे. याकरीता तिघाही सायकलपटू सराव करत आहेत. धुळे ते मध्यप्रदेशातील टिकरी आणि तेथून पुन्हा धुळे येथे येऊन नाशिकला जायचे. तेथून परत धुळे असा स्‍पर्धेचा मार्ग आहे.