चिकन विक्रेते भिडले; एकमेकांवर केला कोयत्याने वार

चिकन विक्रेते भिडले; एकमेकांवर केला कोयत्याने वार
चिकन विक्रेते भिडले; एकमेकांवर केला कोयत्याने वार

जळगाव : जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात चिकन विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांमध्ये आज सकाळी वाद निर्माण झाला. या वादातून झालेल्या हाणामारीत त्‍यांनी एकमेकांवर वार केल्‍याची घटना घडली. यात दोघेही जखमी झाले असून त्‍यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (jalgaon-Chicken-vendors-crowded-and-attack-choper)

चिकन विक्रेते भिडले; एकमेकांवर केला कोयत्याने वार
ऑनलाइन शिक्षणावर प्रश्‍नचिन्‍ह; मोबाईल टॉवरच नसल्‍याने अडचण

शहरातील शिव कॉलनी बसथांबा परिसरात हॉटेल चिनार गार्डन येथे चिकन व मच्‍छी विक्रेते बसत असतात. नेहमीप्रमाणे चिकन विक्रेत्‍यांनी आपली दुकाने लावली. यात आज सकाळी अकराच्या सुमारास जळगाव चिकन सेंटर सद्दाम मेहमूद खाटीक (वय २७, रा.तंबापुरा) आणि लालूभाऊ चिकन सेंटरचे इम्रान गमीर खाटीक या दोन विक्रेत्यांमध्ये ग्राहकांना बोलाविण्याच्‍या कारणावरून वाद झाला.

अन्‌ चिकन कापण्याचा कोयताच काढला

वाद वाढल्याने दोघांनी चिकन कापण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता काढला. शस्त्रे हातात घेत त्‍यांनी एकमेकांवर वार केले. या घटनेत सद्दाम खाटीकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली असून इम्रान खाटीकच्या हाताला दुखापत झाली आहे. दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्‍या या प्रकारामुळे परिसरात शांतता पसरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com