
अक्षयतृतीयेला बालविवाह होण्याचे संकेत?
जळगाव : कोविडच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यांसोबत भेडसावणारी महत्त्वपूर्ण समस्या बालविवाह आहे. सततचे लॉकडाउन, बंद व बेरोजगारी यामुळे बालविवाहाचे (Child marriage) प्रमाण वाढत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अक्षयतृतीयेला (ता. १४) मोठ्या प्रमाणावर बालविवाह होण्याची शक्यता असून, असे विवाह थांबविण्यासाठी सर्वांनीचे सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector abhijit raut) यांनी मंगळवारी केले. (Child marriage in akshay trutiya collector abhijit raut alert team)
हेही वाचा: वाळूचोरट्याने पोलिस अधिकाऱ्यास पटकले; गिरणापात्रात भिडले
अक्षयतृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सामुदायिक, तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार असे विवाह बेकायदा ठरतात. याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे बालविवाह आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात राहणार विशेष लक्ष
बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने संबंधित यंत्रेणेने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करावी. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे व कोठेही बालविवाह होत असल्यास ग्रामीण भागासाठी संबंधित ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हास्तरावर बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलिस विभाग, चाईल्ड लाइन (१०९८), पोलिसपाटील व अंगणवाडीसेविका, प्रत्येक महसुली गावातील गाव बाल संरक्षण समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
Web Title: Marathi Jalgaon News Child Marriage In Akshay Trutiya Collector Abhijit Raut Alert
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..