वाळूचोरट्याने पोलिस अधिकाऱ्यास पटकले; गिरणापात्रात भिडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

valu chori

वाळूचोरट्याने पोलिस अधिकाऱ्यास पटकले; गिरणापात्रात भिडले

जळगाव : गिरणा नदीपात्रात आज अप्पर जिल्‍हाधिकारी, (Jalgaon collector) उपजिल्‍हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह महसूल पथकाने कारवाई केली. यादरम्यान नदीपात्रात (Girna river) उतरलेल्या सहाय्यक निरीक्षकास वाळू माफियाने उचलून पटकल्याची घटना घडली. (girna river police and valu mafiya fighting)

अतिरिक्त पोलिसबलास पाचारण करुन काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून बांभोरीत तणावाची परीस्थिती होती. बांभोरीलगत नदीपात्रातून वाळू उपसा करून पळणाऱ्या सुमारे १५-२० वाहनांना महामार्गावर पकडून तालुका पेालिसांत लावण्यात आल्या.

हेही वाचा: थरारक घटना..पाल जवळ दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

वाळू उपसा सर्रास

गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदा वाळू उत्खनानावर जिल्‍हा प्रशासन कुठलेच निर्बंध लादण्यास किंवा वाळूचोरी थांबवण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील सर्वच वाळू ठेके बंद असतांना जळगावात मात्र, सर्रास बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन होऊन ती, राज्यभरात विविध जिल्ह्यात ब्लॅकने विक्री होते. गिरणा नदीपात्रावरील पुलाच्या शंभर मीटर परिघातून असंख्य ट्रॅक्टर वाळूचा उपसा करताना सहजच पुलावरुन द्रृष्टीस पडतात. वाळूमाफियांची नदीपात्रात भरणाऱ्या जत्रे संदर्भात असंख्य तक्रारी जिल्‍हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत, तर वेळोवेळी प्रसार माध्यमांनीही या प्रकरणी प्रशासनाला उघडे पाडले आहे.

पथकाची कारवाई

असे असताना वाळू उत्खननाचे चक्र काही केल्या बंद होईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. आज अप्पर जिल्‍हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्‍हाधिकारी रवींद्र भारदे, प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह महसूल विभागाचे पथक कारवाईला उतरले होते. बांभोरी पुलाजवळील हॉटेल साई पॅलेस जवळच वाळू वाहतूकदारांना थांबवून पंचनामे करण्यात येत होते. दुपारपर्यंत जवळपास १५-२० वाहने या पथकाने थांबवून त्यांना कारवाईसाठी तालुका पोलिसांत रवाना करण्यात आले. या सर्व वाहन धारकांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: अंधारात बापासाठी मुलगीच बनतेय प्रकाशवाट !

पोलिस अधिकाऱ्याला मारहाण

महसूल विभागाच्या पथकासह पोलिसदलातील अधिकारी कारवाईला उपस्थित होते. संध्याकाळपूर्वी अधिकाऱ्यांचा ताफा नदीपात्रात उतरत असताना रवी सपकाळे ऊर्फ घाऱ्या नावाच्या तरुणाने अधिकाऱ्यांना नदीपात्रात जाऊ देण्यास मज्जाव केला. ‘अधिकारी पात्रात उतरल्यावर मजूर पळून जाताता.. म्हणून तुम्ही पात्रात जाऊ नका’ असे तो अधिकाऱ्यांना सांगत होता. एका पोलिस अधिकाऱ्याने रवी सपकाळेला पोलिस कारवाईचा दम दिला. मात्र, सपकाळे याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत एका अधिकाऱ्यास रवी ऊर्फ घाऱ्याने उचलून पटकल्याचे अनेकांनी पाहिले.

पोलिसांकडून इन्कार

घडल्या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी, या प्रकाराचा इन्कार केला. अधिकाऱ्यास मारहाणीनंतर जळगावहून आलेल्या क्युआरटी फोर्स धडकून सपकाळे याला तुडवण्यात आले.. पाळधी औटपोस्टला रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरु होती.

Web Title: Marathi Jalgaon News Girna River Police And Valu Mafiya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top