esakal | कोरोनाकाळात विरोधकांचा बदनाम करण्याचा ठेकाच : मंत्री गुलाबराव पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

gulabrao patil

आम्ही रस्त्यावर उतरून जनतेला मदत केली. कोरोना आजार इमानदार होता. त्याने कोणालाच सोडले नाही, अशी मिश्कील टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

कोरोनाकाळात विरोधकांचा बदनाम करण्याचा ठेकाच : मंत्री गुलाबराव पाटील

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात आर्थिक नुकसानीचा विचार न करता माणसाच्या जिवाला महत्त्व दिले. कोरोनाकाळात चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उत्कृष्ट काम केले. या काळात विरोधकांनी आम्हाला बदनाम करण्याचा ठेका घेतला होता; परंतु आम्ही रस्त्यावर उतरून जनतेला मदत केली. कोरोना आजार इमानदार होता. त्याने कोणालाच सोडले नाही, अशी मिश्कील टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 
चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या सुसज्ज २३ लाख रुपये खर्चाचा डायलिसिस विभाग व एक कोटीचे नेत्र शस्त्रक्रियागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, तहसीलदार छगन वाघ, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष आबा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, डॉ. शशिकांत गाजरे, महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी पाटील, तालुका महिलाप्रमुख मंगला पाटील आदी उपस्थित होते. 

खेडीभोकरी पुलाचे काम लवकरच
पालकमंत्री पाटील म्हणाले, की चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मार्चनंतर एक्स्प्रेस फीडर बसविले जाईल. ज्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात २४ तास वीज उपलब्ध राहील. खेडीभोकरी-भोकर पुलाच्या कामावर मुख्यमंत्र्यांची सही झाली असून, चोपडा ते जळगाव प्रवास ४० मिनिटांत पूर्ण होईल. लक्षात राहणारे काम करत राहा, इतरांसाठी काम करा. जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका, पोलिस, महसूल, पत्रकार, स्वयंसेवी संस्था यांनी चांगले काम केले. जिल्ह्यातील ७०२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण केली जाईल. त्यात तालुक्यातील लासूर, धानोरा, अडावद ही गावे पहिल्याच टप्प्यात असून, चोपड्यात सर्वांना पाणी पाजू, असे म्हटल्यावर एकच हशा पिकला. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image