लग्‍नाच्या दिवशी नवरदेवाला पोलिस ठाण्याची वारी; हळदीचा व्हीडीओ केला व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

लग्‍नाच्या दिवशी नवरदेवाला पोलिस ठाण्याची वारी; हळदीचा व्हीडीओ व्हायरल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : लग्न समारंभातील हळदीच्या नाच-गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करणाऱ्या नवदेवासह सुमारे १५ ते २० जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा (jalgaon police) दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या दिवशीच त्यामुळे नवरदेवाला पोलिस ठाण्याची वारी करावी लागली. (corona marriage haladi program function crowd video viral social media)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लग्नसोहळ्यासाठी मर्यादा आखून दिल्या असून लग्नासाठी केवळ २५ जणांना परवानगी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अशात शहरातील कानळदा रोडवरील धनाजी काळे नगरात गणेश महाजन या तरुणाचा विवाह होता. १९ मेस रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात स्पीकर लावून त्याने १५ ते २० जणांचा जमाव जमवित नाचगाणे सुरु होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ नवरदेवाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

हेही वाचा: अनोखी शक्कल..कर भरणाऱ्यांना मिळणार सोन्याची नथ

पोलिसांची कारवाई सुरु

हा व्हिडीओ व्हायरल होताच शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी करत नवरदेवासह वऱ्हाडींना ताब्यात घेतले. या पथकात अक्रम शेख, भास्कर ठाकरे, रतनहरी गिते, प्रणेश ठाकूर यांचा समावेश होता.

नवरदेवावर गुन्हा

संचारबंदी व मर्यादा असताना या सोहळ्यात बेकायदेशीरपणे जमाव जमविणाऱ्या नवदेवासह १५ ते २० जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top