
जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी २४ हजार ३२० लसी अगोदरच उपलब्ध आहेत. शनिवार (ता. १६पासून कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यात आणखी १९ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत.
जळगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर प्रतिबंधक लसीकरण भारतात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या शनिवार (ता. १६)पासून कोरोना लसीकरण सात केंद्रांवर सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १९ हजार नवीन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सोमवार (ता. २५)पासून लसीकरण सहा नवीन केंद्र होणार आहे. आता एकूण १३ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी २४ हजार ३२० लसी अगोदरच उपलब्ध आहेत. शनिवार (ता. १६पासून कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यात आणखी १९ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे सहा लसीकरण केंद्रेही सोमवारपासून वाढविण्यात आली आहेत. यात रावेर, पाचोरा, यावल, मुक्ताईनगर, अमळनेर व जळगाव शहरातील एका नानीबाई रुग्णालयाचा समावेश आहे. या नवीन केंद्रांवरील आरेाग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी (ता. २३) प्रशिक्षण देण्यात आले. रविवारी (ता. २५) ड्राय रनही झाला.
आता आठवड्यातील पाच दिवस लस
जिल्ह्यात एकाचवेळी १३ केंद्रांवर पाच दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. मंगळवार व रविवार वगळता सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी असे पाच दिवस लसीकरण होईल.
जिल्ह्यात १९ हजार नवीन कोरोना लसी उपलब्ध झाल्या आहेत. सोमवारपासून सहा नवीन लसीकरण केंद्रे सुरू होतील. १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होईल. यात ज्यांनी महिनाभरापूर्वी लस घेतली आहे त्यांनाच दुसरा डोस दिला जाईल.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
संपादन ः राजेश सोनवणे