esakal | अत्यावश्‍यक सेवेतील सर्वांना ॲन्टिजेन चाचणी आवश्‍यक 

बोलून बातमी शोधा

antigen test

आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता आरटीपीसीआर चाचणीऐवजी ॲन्टिजेन चाचणी करून घ्यावे, असा बदल करण्यात आला आहे.

अत्यावश्‍यक सेवेतील सर्वांना ॲन्टिजेन चाचणी आवश्‍यक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक व्यवसायांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच लसीकरण करून घ्यावे (४५ वर्षांवरील) किंवा ॲन्टिजेन चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. 
खासगी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक यांच्याशी संबंधित कर्मचारी, होम डिलिव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी, विविध परीक्षेचे आयोजनाशी संबंधित कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, खाद्यपदार्थ विक्रेते, औद्योगिक, निर्मिती करणारे घटकात काम करणारे कामगार, कर्मचारी, स्टाफ, संबंधित कर्मचारी, ई-कॉमर्समधील कर्मचारी, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, आरबीआय संलग्न कार्यालयातील कर्मचारी यांनी कोविड लसीकरण न केल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता आरटीपीसीआर चाचणीऐवजी ॲन्टिजेन चाचणी करून घ्यावे, असा बदल करण्यात आला आहे. हा बदल शनिवार (ता. १०)पासून अंमलात येत आहे. मात्र चाचणी करताना कोरोनाची लक्षणं आढळल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी. 

सेतू सुविधा केंद्र सुरू राहणार 
आपले सरकार सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, सीएससी सेंटर्स पासपोर्ट सेवा केंद्रे सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ पावेतो सुरू ठेवता येतील. वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांनी ॲन्टिजेन चाचणी करून घ्यावी किंवा लसीकरण करून घ्यावे. 

पेट शॉप सुरू 
व्हेटनरी हॉस्पिटल्स, अनिमल केअर सेंटर्स, पेट शॉप्स हे दररोज सकाळी सात ते रात्री आठ, या वेळेत सुरू राहतील, तसेच अंडी, चिकन, मांस, मटण, मासे, जनावरांचा चारा विक्री करणारी दुकाने आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल पुरवठा करणारी दुकाने, गुदामे व वाहतूकव्यवस्था, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवता येतील.