esakal | कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दहा हजार बेड 
sakal

बोलून बातमी शोधा

covid center

कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरू नये, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. नागरिक काहीअंशी रस्त्यावर आहेत.

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दहा हजार बेड 

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून नऊशेच्या वर बाधित रुग्ण आढळत आहेत. त्या मुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क होत आहे. उपाययोजनांमधून अधिकाधिक बेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दहा हजारांवर बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्याठिकाणी पुरेसा स्टाफ, औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
शहरात कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरू नये, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. नागरिक काहीअंशी रस्त्यावर आहेत. मात्र शहरात स्वॅब घेतलेल्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक नागरिकांना बाधा झालेली दिसून येत आहे. जनता कर्फ्यूनंतर नागरिक पुन्हा एकत्र येतील तेव्हा बाधितांची संख्या वाढली तर त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत खासगी व शासकीय रुग्णालयांत दहा हजारांवर बेडची व्यवस्था केली आहे. त्यात दोन हजार बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. सर्वच ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा आहे. 
े 
गेल्या सहा दिवसांतील बाधित रुग्ण असे 
७ मार्च -- ५९५ 
८ मार्च -- ६०५ 
९ मार्च -- ७७२ 
१० मार्च -- ९८३ 
११ मार्च -- ९५४ 
१३ मार्च -- ९८२ 
 
कोठे किती बेड -- पूर्वी -- आता वाढविले -- एकूण 
शासकीय महाविद्यालय -- १२५ -- १५० -- २७५ 
ोडॉ. उल्हास पाटील रुग्णालय -- ४०० -- ० -- ४०० 
देवकर महाविद्यालय -- ० -- १०० -- १०० 
महिला रुग्णालय (मोहाडी रोड) -- ० -- ० -- २०० 
शासकीय होस्टेल -- ० -- ० -- २६५ 
सर्व डीसीसी, सीसीसी -- ० -- ० -- सात हजार 
खासगी रुग्णालय -- ० -- ० -- एक हजार 

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रुग्णांसाठी सर्व स्तरावरील सीसीसी, डीसीसी, डीएचसीसी सुरू करण्यात आली आहेत. तेथे बेडसह अत्याधुनिक उपचार यंत्रणा कार्यान्वित आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे. लक्षणं दिसताच उपचारासाठी दाखल व्हावे. 
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

loading image