esakal | सुंठीवाचून खोकला गेला..मग आता कोरोनाही ठेवा दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Ginger coronavirus

सुंठीवाचून खोकला गेला..मग आता कोरोनाही ठेवा दूर

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : सुंठीवाचून खोकला गेला ही म्हण प्रचलित आहे. कारण आयुर्वेदात सुंठीला तितके महत्‍त्‍व आहेच. सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठ किंवा सुंठीची पूड एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास आराम वाटू शकतो. हे अगदी खुप सुरवातीपासूनचा आयुर्वेदीक उपचार आहे. यामुळेच सध्याच्या कोरोना काळात सुंठ पावडरचा वापर करणे योग्‍य ठरत आहे.

अद्रक चांगले प्रकारे वाळविल्यानंतर त्‍याचे सुंठ बनते. सुंठाचा वापर आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. बहुउपयोगी असलेल्‍या सुंठाचे महत्‍त्‍व सध्याच्या कोरोना काळात अधिक जाणवून येत आहे. सुंठाच्या पावडरचा वापर रोज केल्‍यास कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यास मदत तर होतेच; यासोबतच इतर देखील फायदे आपल्‍या शरीरास होवू शकतात.

रोग प्रतिकार शक्‍ती हवी मजबूत

कोणत्याही रोगाशी किंवा आजाराशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असायला हवी. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून यामुळे हैराण झाले आहे. यापासून कसे मुक्त होता येईल याचा संशोधक शोध घेत असून, यापासून बचाव करण्यासाठी अनेकजण आपआपल्‍या परीने प्रयत्‍न करत घरच्या घरी आयुर्वेदीत उपचार करत आहे. त्यासाठी काढ्यांचा वापर, गरम पाणी, हळदीचे पाणी, वाफ घेतली जात आहे. त्या प्रमाणे काढापण घेतला जात आहे. यामुळे सर्दी पडसं, ताप, घसा खवखवणे, घशा दुखणे सारख्या त्रासांपासून मुक्ती मिळू शकते.

सुंठ महत्त्वाची

सुंठीला ‘विश्वभेषज’ म्हणजे संपूर्ण जगाचे औषध असे म्हटले जाते. नुसत्या अनुपान भेदानेसुद्धा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगांवर सुंठ उपयोगी पडते. सुंठीचे प्रमुख उपयोग होतो तो पचन संख्येच्या सर्व विकारांवर उपयोगी आहे.

सुंठ पावडर नाकातून हुंगणे किंवा चाखणे फायदेशीर

कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी असते. सुंठ पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते. कफ, वायू आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुंठेमुळे दूर होत असल्‍याचा उल्‍लेख आयुर्वेदात आहे. यामुळे आताच्या कोरोना महामारीत सुंठ पावडरची नास घेणे फायद्याचे आहे. यामुळे नाकातील सर्व कफ/स्‍त्राव, जंतू बाहेर पडतात. अर्थात नाकाचा मार्ग मोकळा होत असतो. तसेच सुंठ पावडर अगदी चिमुठभर चाखल्‍यास जठर अग्‍नी प्रज्‍वलित होवून पोटाची पचन क्रिया सुधारत आणि पोटातील जंत बाहेर पडत असतात. अर्थात कोरोना विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.

सुंठीचे आणखी काही उपयोग

पाव चमचा सुंठ पावडर आणि छोट्या सुपारीएवढा गुळाचा खडा व ते एकत्र करायला लागेल एवढे घरचे तूप, अशी गोळी करून ती नाश्ता आणि दोन्ही जेवणापूर्वी चावून खाऊन वर कोमट पाणी प्याल्यास भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, अपचन, मळमळ, पोट दुखणे, पोट जड होणे, गॅस, पोटात मुरडून संडास होणे अशा सर्व तक्रारींवर उपयोग होतो. सुंठ घेतल्यावर पित्त होते, हा गैरसमज आहे. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य चांगले असते. शिवाय भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते.

सुंठीला आयुर्वेदात खुप महत्‍त्‍व आहे. आयुर्वेदीत औषधीत ९५ टक्‍के वापर हा सुंठीचा करण्यात आलेला असतो. निश्‍चितच सध्याच्या कोरोनाच्या काळात याचा दैनंदिन वापर करणे फायदेशीर ठरू शकतो. नाकातून हुंगल्‍यास कफ, स्‍त्राव बाहेर पडतो. तसेच चाखल्‍यास आमपाचन चांगले होण्यास मदत होत असते.

- वैद्य सुभाष वडोदकर, आयुर्वेद तंज्ञ.