मे हीटचा तडाखा की पोलिसांची धास्ती..रस्त्यांवर शुकशुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon lockdown

मे हीटचा तडाखा की पोलिसांची धास्ती..रस्त्यांवर शुकशुकाट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : तौत्के वादळानंतर काही दिवस शहरातील तापमानात (Jalgaon temperature) कमालीची घसरण झाली होती. या वादळाचा प्रभाव कमी झाला असून तापमानातही चांगलीच वाढ झाली आहे. सोबतच पोलिसांनी केलेले कडक निर्बंध (jalgaon lockdown) यामुळे शहरातील रस्त्यावर आता दुपारनंतर शुकशुकाट दिसू लागला आहे. असे असले तरी शहरातील कालिका माता मंदिराचा पुढील परिसर, नशिराबाद, गोजोरे, साकेगावसह ग्रामीण भागात सायंकाळी सहानंतर बहुतांश दुकाने सुरू असतात. साहित्य घेण्यासाठी नागरिकांची तेथे गर्दी होते. (coronavirus jalgaon lockdown and temperature hit road people no round)

गेल्या सोमवारपासून (ता.१७) कडक निर्बधांची अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केली आहे. यामुळे रोज आढळणाऱ्या पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या चारशेच्या आत पोचली आहे. असे असले तरी जिल्हा, पोलिस, महापालिका प्रशासनाने कठोरपणे अंमलबजावणी सुरुच ठेवली ओह. शहरासह जिल्ह्यात संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद दिला जात आहे. सोबतच उन्हाचीही तीव्रता वाढली आहे. एकीकडे कडक उन्ह, दुसरीकडे पोलिसांचा प्रसादाला घाबरून नागरिक, युवक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. आगामी काळात पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता पुन्हा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत ‘ब्रेक द चेन’ नुसार संचारबंदीची जिल्हा प्रशासनाकडून शहरासह तालुकास्तरावर अंमलबाजवणी केली जात आहे.

हेही वाचा: ‘म्यूकरमायकोसिस’ मेंदूपर्यंत गेला तर रुग्ण दगावतो

अनेकांना भरावा लागला दंड

शहरातील मुख्य रस्त्यांवर व अंतर्गत रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, थुंकणे, वेळ मर्यादेचे पालन न करणाऱ्या आस्थांपनांवर व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील विविध चौकात पोलिस पथक तैनात करण्यात आले आहेत. ये- जा करणाऱ्या नागरिकांना थांबवून ड्रायव्हींग लायसन्स, वाहनाचे कागदपत्र वा अन्य आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून कागदपत्र नसणाऱ्या व फिरण्याचे योग्य कारण नसल्याने अनेकांना दंड भरावा लागत आहे.

ग्रामीण भागात पोलिसांचे लक्षच नाही

रुग्ण ग्रामीण भागात असतात. यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंधाची घोषणा केली आहे. सकाळी ७ ते ११ नंतर सर्व बंदचे आदेश असताना ग्रामीण भागात सायंकाळी सहानंतर सर्वच दुकाने सुरू असल्याचे चित्र नशिराबाद, साकेगाव, गोजोरा, कुसूंबा आदी भागात पहावयास मिळते. पोलिस चौकात असतात अन दुकानेही सुरूच असतात. यावर पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

loading image
go to top