esakal | ‘म्यूकरमायकोसिस’ मेंदूपर्यंत गेला तर रुग्ण दगावतो
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

‘म्यूकरमायकोसिस’ मेंदूपर्यंत गेला तर रुग्ण दगावतो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : ‘म्यूकरमायकोसिस’ (mucormycosis) आजारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात एकही रुग्ण आतापर्यंत दगावलेला नाही. जे दगावले त्यांना ‘कोविड’ होता. कोवीड झालयानंतर त्यांना उपचारादरम्यान ‘म्यूकरमायकोसिस’ आजाराची लागण झाली होती. ‘म्यूकरमायकोसिस’ हा लवकर लक्षात आला तर बरा होवू शकतो. उशिर होवून तो मेंदूपर्यंत गेला तर मात्र रुग्ण ‘म्यूकरमायकोसिस’ने दगाविला असे म्हणता येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी ‘सकाळ’ला दिली. (mucormycosis no death jalgaon medical collage)

हेही वाचा: कोविडच्या रणसंग्रामात ३१ शिक्षक योध्दांनी गमावला जीव

जे रुग्ण कोविडचे असतात. त्यांना ही व्याधी जडते. यामुळेच कोवीडच्या रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागते. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील ‘म्यूकरमायकोसिस’ रुग्णांचा सात क्रमांकाचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्यात सहा व आयसीयू’त असे एकूण ७ रूग्ण ‘म्यूकरमायकोसिस’चे आहेत. सर्वांवर कोविड व ‘म्यूकरमायकोसिस’चे असे दोन्ही उपचार सुरू आहेत.

कोविडमधून बरे झालेल्‍यांना त्रास

ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते किंवा जे कोविड संसर्ग होवून बरे होवून घरी गेलेले असतात यांच्यात हा रोग अधिक प्रमाणात आढळतो. वेळीच रुग्णालयात दाखल होवून उपचार केल्यास शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. मात्र व्याधी झालेली आहे, लक्षणे दिसत आहे तरी उपचार न घेतल्यास शस्त्रकिया करावी लागते. त्यानंतर रुग्ण बरा होवू शकतो. मात्र ‘म्यूकरमायकोसिस’ जर डोळ्यापर्यंत गेल्यास डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर त्या डोळयाला अंधत्व येते. डोळा काढावा लागतो. जर ‘म्यूकरमायकोसिस’ मेंदूपर्यंत गेला असेल तर मात्र धोका आहे. यामुळे वेळीच निदान करून उपचार या व्याधीत करावा.

हेही वाचा: जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय

अशी आहेत ‘म्यूकरमायकोसिस’ची लक्षणे

- तीव्र डोकेदूखी

- गालावर सुज येणे, बधीरपणा येणे

- डोळ्याच्या आजूबाजूचा, सायनसच्या आजूबाजूचा भाग सुजणे

- नाकाच्या भागाला काळसर ठिपके पडणे

- जबड्याची टाळू व नाकातील त्वचा रंग काळसर होणे

- वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

- वरच्या जबड्यातील दात हलणे

- जबड्यातील दात पडून पू येणे

- नाक बंद पडणे, नाक गळणे, लालसर किंवा काळा स्त्राव येणे

५ मृत्यूचे काय?

आतापर्यंत जिल्ह्यात ‘म्यूकरमायकोसिस’ने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केला आहे. आतापर्यंत २५ रुग्ण जिल्ह्यात ‘म्यूकरमायकोसिस’चे आढळून आले होते. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू ‘म्यूकरमायकोसिस’ने झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी दिलेल्या माहितीबाबत विचारले असता पाच पैकी काहींना कोविड विथ ‘म्यूकरमायकोसिस’ होता, तर काही कोविड होवून ते निगेटीव्ह झाले होते, नंतर ‘म्यूकरमायकोसिस’ झाला होता. त्यात ते मृत झाले आहेत.

loading image