संचारबंदीमुळे माहेरवाशिणींचा हिरमोड; यंदाही महिलांची अक्षयतृतीया सासरीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akhaji jhoka

संचारबंदीमुळे माहेरवाशिणींचा हिरमोड; यंदाही महिलांची अक्षयतृतीया सासरीच!

पारोळा (जळगाव) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी (Lockdown) लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.१४) अक्षयतृतीया असून यंदा मात्र बहुतांशी महिलांची अक्षय तृतीया (Akshay trutiya) सासरी होणार आहे. संचारबंदीमुळे माहेरी येणाऱ्या महिलांना वाहनांची किंवा संसर्गाचा धोका होवू नये, यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. (coronavirus lockdown second year no celebrate akshay trutiya)

कोरोनाच्या चक्रात दुसऱ्यांदा अक्षय तृतीया अडकल्याने माहेरवाशिणींच्या आनंदावर विरजण पडले आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळी व अक्षय तृतीयेला या दोन सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दोन सणासुदीत सासरी असलेल्या महिला सर्व सुखाचे व दुःखाचे क्षण विसरून माहेरी आनंदाचे डोहाळे गातात. मात्र संचारबंदीमुळे अनेकांची अक्षय तृतीया सासरीच होताना दिसून येत आहे.

झोक्याच्या दोरीला कोरोनाचे ग्रहण

सासरी आलेली माहेरवाशीन परिसरातील झाडाला व घराच्या प्रवेश दाराला झोका बांधून ‘आथानी कैरी, तथानी कैरी; कैरी झोका खाय व कैरी झोका खाय तठे कसाना बाजार वं !’ असे म्हणत आईच्या कुशीत आठवणींना मन मोकळे करतात. क्षणभर संसारीक दुःख विसरून झोक्यात रमणारी महिलेच्या आशेवर पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पाणी फिरविले आहे. त्याचा दोरीला कोरोनाचे ग्रहण लागल्याचे सर्वत्र जाणवत आहे.

हेही वाचा: पाटणादेवी जंगलातील थरार; वाळू चोरट्याने चालविले वन कर्मचाऱ्यावर ट्रॅक्टर, सुदैवाने पायावर निभावले

मोबाईलवरच माहेरच्या आठवणींना उजाळा!

अक्षय तृतीयेच्या सणावर कोरोनाचे सावट आल्याने महिलांच्या आशा पूर्णपणे भंग पावले असून मोबाईलवरच माहेरच्या आठवणी व जिव्हाळ्याची देवाण- घेवाण आता मोबाईलवरच बोलण्याचा प्रसंग आला आहे. नातवंडांना कुशीत घेऊन शेत शिवारात फिरत आमरसाचा पाहुणचार करणाऱ्या बाबांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

पारोळ्यात बारागाड्या कार्यक्रम रद्द

शहरात दरवर्षी झपाट भवानी मंदिर जवळून बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने यंदा देखील बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी घरातच अक्षयतृतीया साजरी करावी असे आवाहन प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.

Web Title: Marathi Jalgaon News Coronavirus Lockdown Second Year No Celebrate Akshay

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusJalgaon
go to top