जिल्हा कोविड रुग्णालयात ७४ बेड रिकामे

जिल्हा कोविड रुग्णालयात ७४ बेड रिकामे
covid center
covid centersakal
Updated on

जळगाव : कोरोना महामारीमुळे पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा कोविड रुग्णालयात रुग्णांना दाखल होण्यास बेड उपलब्ध होत नव्हता. अनेक रुग्ण बेड मिळण्यासाठी वेटिंगवर होते. मात्र ही स्थिती लॉकडाउनच्या अंमलबजावणीने सुधारली आहे. ज्या रुग्णालयात बेड मिळत नव्हते तेथे आता चक्क ७४ बेड रिक्त आहेत. यावरून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची आशादायक स्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. (coronavirus positive patient ratio low covid center)

covid center
एकमेकांचा हात पकडत घेतली पुलावरून उडी; पती- पत्‍नी अन्‌ मुलीचा समावेश

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारांवर पोचली होती. यामुळेच एप्रिलच्या मध्यापासून राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केला. त्यात अगोदर नऊ ते सायंकाळी सातदरम्यान फक्त अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, भाजीपाला, दूध, फळे विक्री सुरू होती. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने १ मेपासून ही वेळ सकाळी नऊ ते अकरा अशी करण्यात आली. दरम्यान, १७ मेपासून दुपारी अकरानंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस ॲक्टिव्ह रुग्णसंख्या व रोज पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे.

covid center
कोरोनाने केले पोरके..आई- वडिलांच्या मृत्‍यूने आठ मुले पोरकी

दाखल होणाऱ्यांपेक्षा बरे होणारे अधिक

आता तर केवळ ६११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जसे पॉझिटिव्ह रुग्ण कमी आढळत आहेत तसे खासगी रुग्णालयातील व जिल्हा रुग्णालयातील बाधितही बरे होऊन घरी जात आहेत. दाखल होणाऱ्यापेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे खासगी व शासकीय रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आगामी काळात लवकरच तेही प्रमाण कमी होईल, असा आशावाद जिल्हावासीयांना आहे.

जिल्हा कोविड रुग्णालयातील मंगळवारची स्थिती

- एकूण रुग्णक्षमता---३६८

- रिकामे बेड---७४

- ऑक्सिजनवरील रुग्ण--१४०

- व्हेंटिलेटरवरील रुग्ण--४०

- इतर रुग्ण दाखल --११४

जिल्हा कोविड रुग्णालयात आज ७४ बेड रिकामे आहेत. ऑक्सिजनवर १४० रुग्ण आहेत. व्हेंटिलेटरवर ४० रुग्ण आहेत. येथे रुग्णांना तातडीच्या सेवा दिल्या जातात. येणारा प्रत्येक रुग्ण बरा होऊन घरी जावा त्याप्रमाणे आमचे उपचार करतो. कोरोना संसर्गाच्या नियमांचे कडक पालन केल्यास रुग्णसंख्या लवकरच कमी होईल.

-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com