esakal | डी-मार्ट सील; कोरोना नियमांचे उल्लंघन, मनपाकडून कारवाई 

बोलून बातमी शोधा

d mart}

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पसरल्यासारखे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासाकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई केली जात आहे.

डी-मार्ट सील; कोरोना नियमांचे उल्लंघन, मनपाकडून कारवाई 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असून, जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्ययंत्रणा कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी अक्षरश: रस्त्यावर उतरून कारवाई करीत आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास डी-मार्ट मॉलमध्ये शंभरपेक्षा अधिक ग्राहकांची संख्या एकाच वेळी आढळल्याने सील करण्यात आले. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पसरल्यासारखे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासाकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई केली जात आहे. रविवारी लग्नसमारंभ, मंगल कार्यालय, हॉटेल आदी ठिकाणी कारवाई केली, तर मंगळवारी आठवडेबाजारासह रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. 

एकाच वेळी आढळली ग्राहकांची गर्दी
सायंकाळी सातच्या सुमारास उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने जळगाव शहरातील जळगाव-पाचोरा रस्त्यावरील डी-मार्ट मॉलची पाहणी केली. या वेळी शंभरपेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी आढळले, तर अनेक ग्राहकांच्या तोंडावर मास्क नसणे, कोरोनासंदर्भात उपाययोजना नसल्याचे आढळले.