‘क्रॅकडाउन’मध्ये राहणार करडी नजर; उद्यापासून अंमलबजावणी

‘क्रॅकडाउन’मध्ये राहणार करडी नजर; उद्यापासून अंमलबजावणी
jalgaon curfew
jalgaon curfewjalgaon curfew

पारोळा (जळगाव) : जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (ता. १७) ‘क्रॅकडाउन’ (coronavirus crackdown) जाहीर केला असून, यात संचारबंदीची कडक (Lockdown) अंमलबजावणी होणार आहे. यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर महसूल, पालिका व पोलिस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. विनाकारण बाजारपेठ किंवा गल्लीबोळ फिरू नये, असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. (coronavirus spread ratio down but monday crackdown in jalgaon district)

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाची संपर्क साखळी तुटली नाही. यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या झालेल्या बैठकीत संचारबंदीची कडक अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले असून, अनावश्यक गर्दी, काम नसताना फिरणारे, महत्त्वाचे काम असल्याचे बहाणे करणारे यांच्यासाठी प्रशासन नजर ठेऊन आहे.

jalgaon curfew
‘तौत्के’चा धोका नाही..पण जळगावात पाऊस अन्‌ जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळुन पडली

प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन

पहिल्या लाटेत लोकसहभागामुळे आपण कोरोनाशी दोन हात करीत यश मिळविले होते. दुसरी लाट अत्यंत भयावह असून, सुपर स्प्रेडर या लाटेत अधिक प्रभावी ठरल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. यासाठी सकाळी ७ ते ११ दरम्यान गरज असतानाच नागरिकांनी खरेदीला बाहेर पडावे. विनाकारण गर्दी न करता कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

लस घेताना नियम पाळा

लसीकरण केंद्रावर नागरिकांनी उभे राहताना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. यामुळे संसर्ग न होण्याचा धोका टळतो. लसीकरण केंद्रांवर उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com