‘तौत्के’चा धोका नाही..पण जळगावात पाऊस अन्‌ जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळुन पडली

‘तौत्के’चा धोका नाही..पण जळगावात पाऊस अन्‌ जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळुन पडली
Cyclone Tauktae
Cyclone TauktaeCyclone Tauktae
Updated on

जळगाव : दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळ (Cyclone Tauktae) जळगाव जिल्ह्याला नुकसान नाही. मात्र सकाळपासूनच जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण, मध्येच कडक उन्ह आणि असह्य उकाडा असे वातावरणाचे तिरंग अनुभवास मिळाले. दूपारी अडीचच्या सुमारास पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील जूनी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. (no danger of tautke jalgaon but trees were uprooted due to rain and strong winds)

‘तौत्के’ चक्रीवादळाचा तडाखा आज दक्षिण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मध्य-पश्चिम महाराष्ट्राला बसणार होता. सकाळपासूनच जिल्‍ह्‍यात ढगाळ वातावरण होते. वाऱ्यांचा वेगही अधिक होता. महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी धारकांची यामुळे त्रेधा उडाली होती. जोरदार वाऱ्याने दुचाकी वाहने मागे ओढली जात होती. तर वाऱ्याने शहरातील कचरा उंचावर उडताना दिसत होता.

Cyclone Tauktae
हॉरर वेबसिरीजचे शूटिंग विद्येच्या मंदिरात

वाऱ्यासोबत पाऊसही

दुपारनंतर वाऱ्याची गती वाढली सोबतच ढगाळ वातावरणही झाले. यामुळे कडक उन्हापासून काही अंशी सूटका मिळाली. मात्र उकाडा होत होता. दुपारी अडीचला काही मिनीटे जोरदार वारा अन्‌ पाउस झाला. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. यामुळे काही अंशी का होइना उकाड्यापासून जळगावकरांना सुटका मिळाली.

‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात कोठेही नाही. जोरदार वारे वाहत आहे. मात्र अतिदक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला नाही.

- नरविळसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com